शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

एकही पैसा केंद्राकडे वळता केला नाही; फडणवीसांनी फेटाळला स्वपक्षीय खासदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 12:20 IST

अनंत कुमार हेगडेंचं विधान चुकीचं; फडणवीसांचं स्पष्टीकरण

मुंबई: केंद्राकडून आलेला निधी परत पाठवण्यासाठी देवेंद्र फडणवीस ८० तासांचे मुख्यमंत्री झाल्याचा दावा भाजपाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडेंनी केला. हेगडेंचा हा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला आहे. केंद्राला एकही पैसा परत देण्यात आलेला नाही. या प्रकरणी राज्य सरकारच्या अर्थ विभागानं सत्य समोर आणावं, असं आवाहन फडणवीस यांनी केलं. केंद्राकडून आलेला ४० हजार कोटी रुपयांचा निधी परत पाठवण्यासाठी मी मुख्यमंत्री झालो होतो, या वृत्तात अजिबात तथ्य नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. 'केंद्राला निधी परत करता यावा यासाठी मुख्यमंत्री झालो असा दावा करण्यात आला. त्या दाव्याचं मी खंडन करतो. बुलेट ट्रेन हा केंद्र सरकारचा प्रकल्प आहे. त्यात महाराष्ट्र सरकार केवळ भूसंपादनाचं काम करत आहे. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्राला निधी देण्याचा प्रश्नच येत नाही,' असं फडणवीस यांनी सांगितलं.  'बुलेट ट्रेन असो वा इतर कोणता प्रकल्प, केंद्र सरकारनं राज्याकडे पैसा मागितलेला नाही. त्यामुळे राज्यानंदेखील केंद्राला पैसा दिलेला नाही. फडणवीस ४० हजार कोटी रुपये केंद्राला परत करण्यासाठी मुख्यमंत्री झाले, हे अतिशय चुकीचं विधान आहे. बुलेट ट्रेनच नव्हे, तर इतर कोणत्याही प्रकल्पातला पैसा राज्य सरकारनं केंद्राला परत पाठवलेला नाही. मुख्यमंत्री किंवा काळजीवाहू मुख्यमंत्री असताना मी असा कोणताही निर्णय घेतला नाही. ज्याला सरकारची आर्थिक निर्णय प्रक्रिया समजते, त्याला ही गोष्ट समजू शकते. अशा प्रकारे पैसा देता-घेता येत नाही', असं माजी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकारच्या अर्थ विभागानं सत्य समोर आणावं, असं आवाहनदेखील त्यांनी केलं. काय म्हणाले होते हेगडे?आमचा माणूस महाराष्ट्रात ८० तासांसाठी मुख्यमंत्री झाल्याचं तुम्हाला माहीत असेल. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांनी ८० तासांत राजीनामा दिला. त्यांनी हे सगळं नाट्य का घडवून आणलं? बहुमत नसतानादेखील ते का मुख्यमंत्री झाले? त्यांनी असा निर्णय का घेतला? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत,' असं हेगडे म्हणाले. यानंतर त्यांनी फडणवीस यांच्या ८० तासांच्या मुख्यमंत्रिपदामागचं राजकारण आणि अर्थकारण सांगितलं. 'काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचं सरकार आल्यास केंद्राकडून देण्यात आलेल्या निधीचा गैरवापर होईल याची फडणवीसांना कल्पना होती. त्यामुळेच संपूर्ण नाट्य रचण्यात आलं आणि मुख्यमंत्री होताच १५ तासांमध्ये फडणवीसांनी ४० हजार कोटींचा निधी केंद्राकडे परत पाठवला,' असं हेगडे यांनी सांगितलं. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAnantkumar Hegdeअनंतकुमार हेगडेBJPभाजपाBullet Trainबुलेट ट्रेनSanjay Rautसंजय राऊत