शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्राशिवाय कर्नाटकात प्रवेश नाही; कोगनोळी येथील आंतरराज्य सीमेवर तपासणी पथकाची उभारणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 20:14 IST

महाराष्ट्रातील कोविड रुग्णांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या लक्षात घेता कर्नाटक सरकारने खबरदारीचे उपाय अवलंबण्यास सुरुवात केली आहे.

बाबासो हळिज्वाळे

महाराष्ट्रातील कोविड रुग्णांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या लक्षात घेता कर्नाटक सरकारने खबरदारीचे उपाय अवलंबण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी कोगनोळी येथील महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या टोलनाका या ठिकाणी तपासणी पथकाची उभारणी करण्यात आली आहे. कर्नाटकात प्रवेश करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असणे अत्यावश्यक करण्यात आले आहे. 

बेळगाव जिल्हा प्रशासन व निपाणी तालुका प्रशासन यांच्या वतीने कोगनोळी टोल नाका या ठिकाणी कोविड तपासणी पथकाची उभारणी करण्यात आली असून महसूल विभाग, आरोग्य विभाग व पोलिस प्रशासन यांच्याकडून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्कॅनिंग करून व कोविड प्रमाणपत्र पाहूनच कर्नाटकात प्रवेश दिला जाणार आहे.

पोलीस प्रशासन महसूल विभागातील कर्मचारी आरोग्य विभागातील कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्त्या यांच्यावतीने थर्मल स्कॅनिंग करून संसर्गजन्य आजाराची लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींनाच कर्नाटकात प्रवेश दिला जाईल. येत्या 48 ते 72 तासांमध्ये कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीने काढून घेणे बंधनकारक आहे, असे प्रमाणपत्र नसणाऱ्या व्यक्तींना कर्नाटकातील प्रवेशास मज्जाव करण्यात येणार असल्याचे निपाणीचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.

सोमवारपासून प्रमाणपत्र नाहीतर प्रवेश नाहीसध्या कोविड प्रमाणपत्राची सक्ती केली नसली तरी येत्या 48 ते 72 तासांमध्ये प्रमाणपत्र काढून घेऊनच कर्नाटकात प्रवेश करावा. त्या संदर्भातील जागृती डिजिटल फलकाद्वारे याठिकाणी करण्यात आली आहे. मोटरसायकल पासून बस पर्यंत सर्वच वाहनांचे थर्मल स्कॅनिंग करूनच कर्नाटकात प्रवेश दिला जाणार आहे. जर काही कोविड सदृश्य लक्षणे आढळली तर त्यांना परत पाठविण्यात येईल. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटक