शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईच्या मंदिरात तोकड्या कपड्यांवर बंदी; पश्चिम देवस्थान समितीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 19:12 IST

महेश जाधव यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सपासून अंबाबाई मंदिरात आता महिला व मुलींना तसेच पुरुषांना पूर्ण कपड्यांत प्रवेश दिला जाणार आहे. असा निर्णय सोमवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकारांना सांगितले की, पश्चिम महाराष्ट्र अंतर्गत येणाऱ्या सर्व देवालयांना हळहळू टप्प्याटप्प्याने हा निर्णय लागू केला जाईल. याची सुरुवात अंबाबाई मंदिरातील देवस्थानपासून येत्या नवरात्रोत्सवापासून म्हणजेच १० ऑक्टोबरपासून होणार आहे.

हा निर्णय घेताना याविषयी महेश जाधव यांनी सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक भाविकांनी येथील श्रद्धास्थान जपले जावे, पावित्र्य राखावे यासाठी स्त्रिया, महिला, पुरुष यांनी पूर्ण कपड्यातच प्रवेश केल्यास अंबाबाई मंदिराची शोभा वाढेल असे सांगितले; याची दखल तसेच भाविकांच्या तक्रारींचा आदर आणि आपल्या कोल्हापूरच्या अंबाबाईचे श्रद्धा व पावित्र्य राखले जावे म्हणूनच हा निर्णय घेतल्याचे शेवटी जाधव यांनी  सांगितले.

यावेळी बैठकीला कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, सचिव विजय पवार, सदस्य शिवाजीराव जाधव, संगीता खाडे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

निर्णय वादग्रस्त होण्याची शक्यता?हा निर्णय घेतला गेल्यास यावर आता महिलावर्गातून नेमक्या कशा प्रतिक्रिया उमटणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात प्रथमच अशा प्रकारचा निर्णय होत असल्याने हा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTempleमंदिर