शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

समान नागरी कायदा नको - मुस्लीम कायदा मंडळ प्रतिनिधींची मागणी

By admin | Updated: February 18, 2017 21:17 IST

समान नागरी कायद्यापेक्षाही महिलांच्या कितीतरी समस्या असून मुळात सध्या सर्व समाजातील महिलांवर चालणारे अत्याचार थांबविण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज आहे

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. १८ -  सध्याचे केंद्र सरकार व काही प्रसारमाध्यमे समान नागरी कायद्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. मुसलमान महिला त्यांच्या खासगी कायद्याबाबत समाधानी असून त्यांना समान नागरी कायद्याअंतर्गत आणू नये. समान नागरी कायद्यापेक्षाही महिलांच्या कितीतरी समस्या असून मुळात सध्या सर्व समाजातील महिलांवर चालणारे अत्याचार थांबविण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज आहे. महिलांची तस्करी, बलात्कार, खून, लैंगिक अत्याचाराविरोधात आदी आवाज उठवावा, असे मत अखिल भारतीय मुस्लीम कायदा मंडळाच्या सदस्य फकिरा अतीक यांनी व्यक्त केले. शनिवारी गोवा स्टडी ग्रुप व गोवा इंटरनॅशनल सेंटरतर्फे दोनापावल येथे आयोजिलेल्या समान नागरी कायद्यावरील परिसंवादात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो उपस्थित होते. तसेच माजी अ‍ॅडव्होकेट जनरल अ‍ॅड. मनोहर उसगावकर व व्ही.एम. साळगावकर कायदा महाविद्यालयाचे प्राचार्य एम.आर.के. प्रसाद व्यासपीठावर उपस्थित होते. अतीक यांनी सांगितले की, खाजगी कायद्याअंतर्गत सर्व अधिकार मिळत असून समान नागरी कायद्याची सक्ती केली तर सामाजिक रचनेला अडथळा येईल. आमचे देव व देवाला पूजनाच्या पध्दती वेगवेगळ्या आहेत तर कुटुंबाचे कायदे समान कसे असतील. मुस्लीम खासगी कायदे हे घटनात्मक अधिकार असून कुणालाच त्यात बदल करण्याचा अधिकार नाही. सध्याची स्थीती पाहिली तर टीव्ही चॅनल्स हा मुद्दा घेऊन ढोंगीपणा करतात. असे झाले तर राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण होईल. समान नागरी कायदा ही संकल्पना पाश्चात्य संस्कृतीतून आली आहे. हिंदू खासगी कायद्यामध्ये न्यायालय हस्तक्षेप करत नाही तेव्हा मुस्लीम खासगी कायद्याकडेच हस्तक्षेप का करत आहे, असा प्रश्न त्यांनी केला. प्रसारमाध्यमांनी मुस्लीम महिला कोणत्या तरी दबावाखाली असल्याचे चित्र उभे केले आहे ते योग्य नव्हे. चुकीच्या पद्धतीने चॅनल्सवर हा प्रश्न मांडण्यात येत असून त्याद्वारे वाईट संदेश जात आहे. इस्लाममध्ये महिला व पुरुषांना समान अधिकार आहेत. तसेच मुस्लीम समाजात घटस्फोटांचे प्रमाण सर्वात कमी असल्याचे त्या म्हणाल्या. मुस्लीम महिलांवर सध्याचे सरकार समान नागरी कायदा स्वीकारण्यासाठी दबाव आणू शकत नाही, असे मत अतीक यांनी व्यक्त केले. गोव्यात समान नागरी कायद्यामुळे लग्नाची नोंदणी करणे सक्तीचे असून हा कायदा योग्य असल्याचे अ‍ॅड. उजगावकर म्हणाले. नोंदणी झाली की महिलांना सोडून देण्याचे भय राहत नाही. नोंदणी न झाल्याने पत्नीला सोडून देण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तेव्हा कायदेशीर कागदपत्रे असलेली बरी. देशातील विविध धर्मांमध्ये महिलांवर चालणारे अत्याचार अगोदर थांबविले पाहिजेत. तसेच महिलांना समान अधिकार मिळाले पाहिजेत. आदर्श समान नागरी कायदा करून तो लोकांसाठी खुला करून त्यावर चर्चा व्हावी नंतरच त्याची अंमलबजावणी करावी, असे मत डॉ. प्रसाद यांनी व्यक्त केले. समान नागरी कायदा अमलात आणला तर ते एका दृष्टीने चांगलेच ठरणार, असे एदुआर्द फालेरो यांनी सांगितले. गोव्यात हा कायदा पोर्तुगीज काळापासून अमलात असून यात मुसलमान, हिंदू, ख्रिश्चन धर्म या कायद्याचे पालन करतात. या विषयावर सरकारने सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असलेली खास करून मुसलमान समाजातील न्यायाधीश, धर्माचे तज्ज्ञ, मुसलमान महिला प्रतिनिधी यांची सल्लागार समिती स्थापन करावी व नंतरच मसुदा तयार करून तो संसदेत मांडण्यात यावा, असे फालेरो यांनी सांगितले. (प्रतिनिधी)