शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

१७१ गावांभोवती ‘नायट्रेट’चा फास! युरियाचा अतिवापर घातक; जनतेच्या आरोग्याला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 08:49 IST

खतांच्या वापरात जळगाव राज्यात अव्वल, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील १७१ गावांमधील २०५ विहिरी, कूपनलिकांसह जलस्रोतांच्या ठिकाणांवरून पाण्याचे नमुने घेतले.

कुंदन पाटील

जळगाव : युरियाच्या अतिवापरामुळे जळगाव जिल्ह्यातील १७१ गावांमधील पाण्याच्या २०५ नमुन्यांमध्ये ‘नायट्रेट’चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून आले आहे. परिणामी या गावातील जनतेच्या आरोग्याभोवती ‘नायट्रेट’ने फास आवळला आहे. 

राज्यात सर्वाधिक रासायनिक खतांचा वापर जळगाव जिल्ह्यात होतो. वर्षाकाठी ५.५० लाख मेट्रिक टन खतांचा वापर होतो. मात्र, युरिया खताचा अतिरेक जमीन आणि पर्यावरणासाठी घातक ठरू लागला असल्याचे स्पष्ट होत आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने गेल्या वर्षी मान्सूनपूर्व व मान्सूनपश्चात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील १७१ गावांमधील २०५ विहिरी, कूपनलिकांसह जलस्रोतांच्या ठिकाणांवरून पाण्याचे नमुने घेतले.

‘नायट्रेट’चे प्रमाण किती?पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे सुरक्षित प्रमाण प्रतिलिटर ४५ मिलिग्रॅमपेक्षा जास्त नसावे. मात्र, या अहवालानुसार या पाण्यात ६० ते ८० मिलिग्रॅम नायट्रेटचे प्रमाण असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

असे होते प्रदूषणशेतातील पाण्यासोबत युरियाची अभिक्रिया होऊन त्यातून  ‘अमोनियम’ हे संयुग तयार होते. हे संयुग जमिनीत अस्थिर असते व नैसर्गिकरीत्या जमिनीमध्ये असणाऱ्या नायट्रोसोमोनास नावाच्या जिवाणूमुळे ‘नायट्राइट’ या घटकामध्ये रूपांतरित होते. यानंतर लगेचच नायट्रोबॅक्टर नावाच्या आणखी एका जिवाणूमुळे नायट्राइटचे रूपांतर ‘नायट्रेट’ या आयनामध्ये होते. 

सर्व पिके नत्र हे याच नायट्रेट स्वरूपात घेतात. म्हणजेच जेव्हा युरिया नायट्रेट स्वरूपात येतो तेव्हा पिकांची मुळे त्याला अन्न म्हणून शोषून घेतात. हा नायट्रेट घटक आयन स्वरूपात असल्यामुळे जमिनीमध्ये अतिशय जास्त चल स्वरूपात असतो. हा नायट्रेट जमिनीत पाण्यासोबत झिरपून जातो आणि जमिनीतील भूगर्भातील पाण्यामध्ये मिसळतो.  नाले, ओढा यांच्यामार्फत नद्यांमध्येदेखील मिसळतो. त्यातूनच पिण्याच्या पाण्यात नायट्रेटमुळे प्रदूषण होते.

जिल्ह्यातील विदारक परिस्थितीवर मात करण्यासाठी ‘नॅनो युरिया’चा वापर करावा. नॅनो युरियामधील नत्राच्या अतिसूक्ष्म कणांमध्ये २० टक्के नत्र असते. नॅनो युरियातील कोणताही घटक पाणी, हवा किंवा जमिनीमध्ये मिसळत नाही. - पद्मनाभ म्हस्के, कृषी विकास अधिकारी, जि.प. जळगाव

आरोग्यावर काय परिणाम?पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचा अंश अधिक प्रमाणात आढळून आल्यास असे पाणी लहान मुलांच्या, गर्भवती महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत गंभीर आजार निर्माण करू शकते. यामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. तसेच या पाण्यापासून आरोग्यास धोका निर्माण होतो. असे पाणी पिणे योग्य नसते.