नितीन शिर्के यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:59 IST2017-07-18T00:59:22+5:302017-07-18T00:59:22+5:30
आयबीएन लोकमत वृत्तवाहिनीत कार्यरत असलेल्या नितीन शिर्के या तरुणाने आत्महत्या केली. रविवारी रात्री उशिरा लोअर परेल स्थानकात चर्चगेटच्या दिशेने

नितीन शिर्के यांची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आयबीएन लोकमत वृत्तवाहिनीत कार्यरत असलेल्या नितीन शिर्के या तरुणाने आत्महत्या केली. रविवारी रात्री उशिरा लोअर परेल स्थानकात चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकलखाली येऊन नितीनने जीवनयात्रा संपविली. आत्महत्येपूर्वी नितीनने फेसबुकवर पोस्ट टाकली होती, त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. नितीनचे पार्थिव त्याच्या कुटुंबीयांकडे सोमवारी देण्यात आले.