शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाकडून मिहीर कोटेचांच्या कार्यालयाची तोडफोड; मुंबईत जोरदार राडा
2
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
3
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
4
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
5
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
6
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
7
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
8
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
9
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
10
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
11
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
12
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
13
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
14
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
15
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
16
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
17
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
18
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
19
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
20
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान

इंडिगोच्या विमानात गंभीर तांत्रिक बिघाड; नितीन गडकरींचं उड्डाण रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 10:13 AM

योग्य वेळी तांत्रिक चूक लक्षात आल्यानं उड्डाण रद्द करण्याचा निर्णय

नागपूर: दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं त्याचं उड्डाण रद्द करण्यात आलं. याच विमानातून काही प्रवाशांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रवास करणार होते. मात्र ही बाब योग्य वेळी वैमानिकाच्या लक्षात आली. त्यामुळे त्यानं विमानाचं उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला. यानंतर विमान धावपट्टीवरुन टॅक्सीवेकडे नेण्यात आलं.  आज संध्याकाळी दिल्लीत दिवंगत माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्र सरकारमधील अनेक मंत्री आणि भाजपाचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. त्याचसाठी नितीन गडकरी दिल्लीला जात होते. मात्र ऐनवेळी विमानात बिघाड झाल्याचं समजल्यानं त्यांनी विमानतळाहून घरी परतण्याचा निर्णय घेतला. नागपुरातून दिल्लीला जाण्याच्या तयारीत असलेले इंडिगोचे  6ई 636 विमान तांत्रिक कारणांमुळे धावपट्टीवरून दोनदा परतले. सकाळी 9.30 वाजता पहिल्या उड्डाणावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विमानात होते. पहिल्यांदा विमान रद्द झाल्यानंतर गडकरी विमानातून उतरून घरी परतले. यानंतर पुन्हा 10.45 वाजता विमानानं उड्डाणाचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीIndigoइंडिगो