शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

'वैभव नाईकांची शिंदेंकडे उठबस, ते केवळ तनाने ठाकरेंसोबत, तर मनाने..' नितेश राणेंचा सनसनाटी दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 12:38 IST

Vaibhav Naik News: जे सकाळचा नाश्ता एकनाथ शिंदेंच्या घरात करतात आणि रात्री निघताना वर्षावरून निघतात, अशा वैभव नाईक यांनी त्यांचा दिनक्रम उद्धव ठाकरेंना दाखवावा, असे नितेश राणे म्हणाले.

एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडून अनेक आमदार हे एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. मात्र काही आमदारांनी उद्धव ठाकरेंसोबत राहणं पसंत केलं होतं. मात्र यातील काही आमदार हे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना शिंदे गट तसेच भाजपाकडून करण्यात येत असतो. दरम्यान, ठाकरे गटातील आघाडीच्या आमदारांपैकी एक असलेल्या वैभव नाईक यांच्याबाबत नितेश राणेंनी सनसनाटी दावा केला आहे. वैभव नाईक हे केवळ तनाने उद्धव ठाकरेंसोबत असून, ते मनाने कधीच एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. 

शिंदे गट हा लवकरच भाजपामध्ये विलीन होईल. तसेच शिंदेंना दसरा मेळावा घ्यायचा असेल तर तो त्यांनी तो भाजपाच्या कार्यालयातून घ्यावा अशी टीका वैभव नाईक यांनी केली होती. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता नितेश राणे म्हणाले की, जो आमदार सकाळचा चहा-नाश्ता आणि रात्रीचं जेवण एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात करतो. त्याने आम्हा लोकांवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करू नये. जे सकाळचा नाश्ता एकनाथ शिंदेंच्या घरात करतात आणि रात्री निघताना वर्षावरून निघतात, अशा वैभव नाईक यांनी त्यांचा दिनक्रम उद्धव ठाकरेंना दाखवावा. वैभव नाईक हे केवळ शरीराने ठाकरेंसोबत आहेत. ते मनाने कधीच एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

पुढच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंचे मंत्री भाजपाच्या चिन्हावर लढतील, या संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यालाही नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी आधी त्यांचा भाऊ मशालीवर लढणार आहे की घड्यावर लढणार आहे की शरद पवार यांच्या पक्षाच्या चिन्हावर लढणार आहे, हे जाहीर करावं, त्यानंतर इतरांना कमळ चिन्हाचे सल्ले द्यावेत, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.   

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक Nitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे