शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! नितेश राणे प्रकरण; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 15:19 IST

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आणि शिवसैनिकाला मारहाण यासंदर्भात भाजपाचे आमदार नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी होत आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापलेले आहे. गेल्या तीन दिवसांपासून नितेश राणे नॉटरिचएबल आहेत. ते नेमके कुठे आहेत? हे कुणालाही माहीत नाही. 

 सिंधुदुर्ग - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यासंदर्भात महाराष्ट्र पोलिसांनी नोटीस बजावली आहे. महत्वाचे म्हणजे, नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सिंधुदुर्ग न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच कणकवली पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आणि शिवसैनिकाला मारहाण यासंदर्भात भाजपाचे आमदार नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी होत आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापलेले आहे. गेल्या तीन दिवसांपासून नितेश राणे नॉट रिचेबल आहेत. ते नेमके कुठे आहेत? हे कुणालाही माहीत नाही. 

यासंदर्भात, काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर, नितेश राणे कुठे आहेत हे मला माहित नाही आणि मी ते तुम्हाला का सांगू? असा प्रतिप्रश्नही नारायण राणे यांनी केला होता. याचा अप्रत्यक्ष अर्थ नारायण राणे यांना नितेश राणे यांच्यासंदर्भात माहिती तर नाही ना, असाही होत होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नारायण राणे यांना नितेश राणे यांच्या संदर्भात विचारणा करत ही नोटीस बजावली असल्याचे समजते.

नितेश राणेंसंदर्भातील प्रश्नावर नेमकं काय म्हणाले होते राणे? -संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंचा हात असल्याचा आरोप शिवसेना करत आहे. यासंदर्भात, एका पत्रकाराणे नारायण राणे यांना नितेश राणे कुठे आहेत, असा प्रश्न केला असता ते भडकले आणि म्हणाले, असा प्रश्न असतो? ते कुठे आहेत हे सांगायला काय मूर्ख माणून समजलात का तुम्ही मला? कुठे आहेत काय आहेत, जरी मला माहीत असेल तरी मी सांगणार नाही. का सांगावं? तुम्हाला का सांगावं? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला होता.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणेNitesh Raneनीतेश राणे BJPभाजपाPoliceपोलिस