शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Nitesh Rane: सरकार पडण्याची वेळ येते तेव्हाच मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात?, नितेश राणेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 16:38 IST

गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेले नितेश राणे यांची आज जामीनावर सुटका झाली. पोलीस कोठडीतून बाहेर येताच नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

कोल्हापूर-गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेले नितेश राणे यांची आज जामीनावर सुटका झाली. पोलीस कोठडीतून बाहेर येताच नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. नितेश राणेंना राजकीय आजार झाल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली होती. त्यावर बोलताना नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेच्या शस्त्रक्रियेबाबतच्या मुद्द्यावर विधान करुन खळबळ उडवून दिली आहे. "प्रश्न तर आम्हीही विचारू शकतो. जेव्हा सरकार पडण्याची वेळ येते, तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट घालतात का?", असा सवाल उपस्थित करत नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं आहे. 

"मला आजही त्रास होतोय, कोल्हापूरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला असला तरी मी एसएसपीएम रुग्णालयात दाखल होणार आहे. मणका, पाठीचा त्रास, शुगल लो होत आहे. त्यावर उपचार घेणार आहे. पण जे बोललेत की हा राजकीय आजार आहे. त्यांना माझं एकच सांगणं आहे की मग आरोग्य व्यवस्थेने केलेल्या चाचण्या काय खोट्या आहेत का? आताच माझं बीपी तपासून पाहिलं तर ते १५२ इतकं आहे. ते काय खोटं दाखवत आहे का? कुणाच्याही प्रकृतीबाबत प्रश्न उपस्थित करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभतं का?", असे सवाल उपस्थित करत राणेंनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. 

मुख्यमंत्री ठाकरेंवर लक्ष्य "माझ्या प्रकृतीबाबत शंका उपस्थित केली जात आहे. तसे प्रश्न आम्हीही विचारू शकतो. जेव्हा सरकार पडण्याची वेळ येते, तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट घालतात का? लतादीदींच्या अंत्यविधीला मुख्यमंत्री गेले त्यावेळी कोणताही बेल्ट नव्हता. मग ते अधिवेशनावेळीच नेमकं आजारी कसे पडतात? चौकशीवेळीच महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना कोरोना कसा होतो? कुणाच्याही आरोग्यबाबत असे प्रश्न उपस्थित करणं कितपत योग्य आहे? राजकारणाचा स्तर किती खालावू शकतो याचाही विचार करायला हवा", असं नितेश राणे म्हणाले. 

मी ज्या दिवशी बोलेन तेव्हा..." मी कोणत्याही तपास कार्यातून लांब गेलो नव्हतो. तपास कार्यात कोणताही अडथळा आणला नाही. जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होतो. मला अटक केली नाही तर मी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झालो. हे सरकार मला अटक करु शकले नाही. या सर्व प्रकरणावर मी बोलणार आहे. ज्या दिवशी मी बोलणार त्या दिवशी मात्र अनेकांना बीपीचा त्रास सुरू होईल", असा इशाराच यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.

 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे