शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शिवभोजन थाळीला नितेश राणे देणार टक्कर; विनामुल्य 'कमळ' थाळीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 13:20 IST

कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनीही गेल्याच आठवड्यात जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये शिवभोजन थाळी सुरु केली होती. 

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर गरिबांना कमी दरात जेवण देण्यासाठी सरकारकडून शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली होती. आता याला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे आमदार पूत्र नितेश राणे टक्कर देणार आहेत. नितेश राणे यांनी कमळ थाळीची घोषणा केली आहे. नितेश राणे यांनी असाच शिववडा पावला टक्कर देण्यासाठी ९ वर्षांपूर्वी छत्रपती वडा पाव सुरु केला होता. 

कणकवली शहरामध्ये नगरपंचायतीच्या सहकार्याने उद्या बुधवारपासून दररोज १५० लोकांसाठी 'कमळ' थाळी देण्यात येणार असल्याची घोषणा नितेश राणे यांनी केली आहे. महत्वाचे म्हणजे या थाळीसाठी एकही रुपया मोजावा लागणार नाही. ही थाली विनामुल्य असणार आहे. कोरोना संकटाच्या काळात गरिबांना ''कमळ" थाळीमुळे नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. 

याबाबतचे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. या थाळीमध्ये २ मूद भात, २ चपाती, १ वरण / डाळ ( आमटी ), १ भाजी या पदार्थांचा समावेश असणार आहे. हे केंद्र लक्ष्मी विष्णू हॉल, विद्यानगर ( संजीवन हॉस्पिटलजवळ) येथे सुरु करण्यात येणार आहे. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत याठिकाणी १५० थाळी देण्यात येणार आहेत. कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनीही गेल्याच आठवड्यात जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये शिवभोजन थाळी सुरु केली होती. 

धक्कादायक! जितेंद्र आव्हाडांना तीन दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण; नगरसेवकाचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदींआधीच सोनिया गांधींचा देशवासियांना संदेश

धक्कादायक! भारतासाठी येणारे टेस्टिंग किटचे जहाज अमेरिकेला पाठविले; WHO वर गंभीर आरोप

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाshiv bhojnalayaशिवभोजनालयShiv Senaशिवसेना