शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

निसर्ग चक्रीवादळ आज रायगडला धडकणार; संचारबंदी जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 6:43 AM

आपत्कालीन यंत्रणा सतर्क : मुंबई, ठाणे, पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/अलिबाग/पालघर : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीकडे कूच करीत असून बुधवारी दुपारी ते अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण पट्टा आणि दमण, गुजरात परिसरात ताशी १२० किमी वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने ‘रेड अलर्ट’ देऊन मुंबईसह किनारपट्टी भागात संचारबंदी जारी केली आहे. रायगडच्या किनारपट्टी भागातून ४० हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. भारतीय नौसेना, भारतीय तटरक्षक दल व सर्व आपत्कालीन यंत्रणा सतर्क असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबईसह कोकणात चक्रीवादळ सहसा धडकत नाहीत. २००९ साली फियान चक्रीवादळ मुंबईजवळच्या किनारपट्टीला धडकले होते. हा अपवाद वगळता या आपत्तीचा सामना करण्याची वेळ आता आल्याने खबरदारी म्हणून रायगड आणि पालघर जिल्ह्यांत एनडीआरएफच्या १५, एसडीआरएफच्या पाच तुकड्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून पाच तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास अरबी समुद्रातील चक्रीवादळ पणजीपासून २८० किमी, मुंबईपासून ४३० किमी आणि सुरतपासून ६४० किमी अंतरावर होते. ताशी ११ किलोमीटर या वेगाने ते उत्तर-पूर्व दिशेकडे सरकत आहे. पुढच्या बारा तासांमध्ये याचा वेग आणखी वाढेल. बुधवारी दुपारी किंवा संध्याकाळी ते उत्तर मध्य महाराष्ट्र आणि गुजरातदरम्याचे हरिहरेश्वर, दमण आणि अलिबाग ओलांडेल. यावेळी येथे ताशी १२० किमी वेगाने वारे वाहतील आणि किनारपट्टी भागात अतिमुसळधार पाऊस पडेल.173000नागरिक प्रभावित होण्याची शक्यताअलिबाग : रायगडमधील सात तालुक्यांतील समुद्र तसेच खाडी किनाऱ्यांवरील ६० गावांमधील सुमारे एक लाख ७३ हजार नागरिक प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यातील तब्बल ४० हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे.सिंधुदुर्गात समुद्राच्या लाटांची उंची वाढलीकमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सिंधुदुर्गमध्ये मंगळवार दुपारी साडेबारानंतर समुद्राच्या लाटांची उंची वाढली असून वाºयाने जोर धरण्यास सुरुवात केल्याने किनारपट्टी भागात घबराटीचे वातावरण आहे. रत्नागिरीतही अशीच स्थिती आहे.पालघर किनारपट्टीवर दहशत;ताशी १२० किमी वेगाने वारे वाहणारडहाणू तालुक्यातील किनाºयावरील सतीपाडा, दिवादांडी, मांगेलवाडा, आगर, नरपड, धाकटी डहाणू, तडियाले, गुंगवाडा, घोलवड, बोर्डी आदी भागातील नागरिकांना सुरक्षितता म्हणून प्रशासनाने केएल पोंदा हायस्कूल, सेंट मेरीज हायस्कूल व दोन सभागृहांत हलविले आहे.याच भागाला वादळाचा सर्वाधिक तडाखा बसण्याची शक्यता आहे. किनाºयावर वादळपूर्व स्थिती निर्माण होत असून मंगळवारी दुपारपासूनच पावसाच्या हलक्या सरींची रिपरिप सुरू आहे. मच्छीमारांना समुद्रात मासेमारी करण्यास प्रशासनाने अगोदरच मनाई केली आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ