शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आणखी नऊ महिला कर्मचा-यांना बाधा

By admin | Updated: April 7, 2015 04:29 IST

महाड औद्योगिगक वसाहतीमधील अ‍ॅस्टेक लाइफ साईन्सेस कारखान्यातून काल रविवारी झालेल्या वायुगळतीमुळे आणखी नऊ महिला

महाड : महाड औद्योगिगक वसाहतीमधील अ‍ॅस्टेक लाइफ साईन्सेस कारखान्यातून काल रविवारी झालेल्या वायुगळतीमुळे आणखी नऊ महिला कर्मचाऱ्यांना त्याची बाधा झाल्याने त्यांना एमएमए रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर वायुगळती होऊनही त्याप्रकरणी अद्यापही पोलिसांकडून कारखाना व्यवस्थापनावर वा कारखाना निरीक्षकांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.रविवारी दुपारी अ‍ॅस्टेक कारखान्यात उत्पादन सुरू असताना प्रचंड वायुगळती झाली होती़ सपंूर्ण परिसरात धुराचे लोट पसरल्याने त्याचा त्रास आजूबाजूच्या कारखान्यांतील कर्मचारी तसेच परिसरातील ग्रामस्थांना झाला होता. या कारखान्याशेजारीच असलेल्या रेमी फेन लि. कारखान्यातील ८० महिला कर्मचाऱ्यांना या वायूची बाधा झाली होती़ त्यांच्यावर एमएमए रुग्णालयात उपचार सुरू असतानाच रविवारी रात्री याच कारखान्यातील आणखी नऊ महिला कामगारांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले.वायुगळतीबाबत कारखाना व्यवस्थापनही कोणताही खुलासा करू शकले नाही, तर कारखान्यातील सुरक्षितता व्यवस्थेचाही चांगलाच बोजवारा उडाल्याचे यातून स्पष्ट दिसून आले आहे. यावर काय कारवाई केली जाते याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान सुप्रीया गावंडे, उज्ज्वला काळे, शीतल कदम, आरती थोरात, वृषाली तांबडे, संगीता गायकवाड, शुभा गायकवाड, सुनीता झांजे या वायुबाधा झालेल्या महिला कामगारांवर उपचार सुरू आहेत. (वार्ताहर)