नऊ वाहने एकमेकांवर आदळून अपघात, 40 हून अधिक जखमी
By Admin | Updated: May 31, 2017 02:08 IST2017-05-31T00:26:55+5:302017-05-31T02:08:30+5:30
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील पाचवड फाटा येथे मंगळवारी रात्री सव्वा अकराच्या

नऊ वाहने एकमेकांवर आदळून अपघात, 40 हून अधिक जखमी
ऑनलाईन लोकमत
कराड (सातारा), दि. 31 - पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे मंगळवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास नऊ वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात 40 हून अधिक जण जखमी झाले. जखमींना कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तीन खासगी प्रवासी बस, दोन कार, दोन जीप आणि दोन ट्रक यांच्यात हा अपघात झाला.