निलेश राणे गुहागरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार

By Admin | Updated: August 16, 2014 18:29 IST2014-08-16T18:27:29+5:302014-08-16T18:29:55+5:30

कसभा निवडणूकीत पराभूत झालेल्या माजी खासदार निलेश राणे अपक्ष म्हमून गुहागरमधून निवडणूक लढवणार आहेत.

Nilesh Rane will contest as an independent from Guhagar | निलेश राणे गुहागरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार

निलेश राणे गुहागरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार

ऑनलाइन टीम

गुहागर, दि. १६ - लोकसभा निवडणूकीत पराभूत झालेल्या माजी खासदार निलेश राणेंनी आता अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांच्याविरोधात आपण गुहागरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा निलेश यांनी शनिवारी केली. जाधव यांची पैशांची मस्ती उतरवणार असे सांगत  त्यांनी जाधव यांना आव्हान दिले आहे. 
लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांचा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. काँग्रेसने धोका  दिल्यानेच पराभव झाल्याचा आरोप नारायण राणेंनी केला होता. त्यामुळे आपल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी निलेश राणे थेट भास्कर जाधवांसमोरच उभे राहिले आहेत. मात्र त्यांच्या या इच्छेला काँग्रेसकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी असल्याने त्यांनी अपक्ष म्हमून निवडणूक लढवण्याची घोषणाही केली आहे.

Web Title: Nilesh Rane will contest as an independent from Guhagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.