नीलेश राणे हाजिर हो ! : कोर्टाने जामीन फेटाळला

By Admin | Updated: May 18, 2016 04:52 IST2016-05-18T04:52:45+5:302016-05-18T04:52:45+5:30

संदीप सावंत मारहाण व अपहरणप्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांची अटकपूर्व जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला

Nilesh Rane be present! : The court rejected the bail | नीलेश राणे हाजिर हो ! : कोर्टाने जामीन फेटाळला

नीलेश राणे हाजिर हो ! : कोर्टाने जामीन फेटाळला


मुंबई : काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप सावंत मारहाण व अपहरणप्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांची अटकपूर्व जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. राणे यांच्यावर असलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत, असे म्हणत उच्च न्यायालयाने त्यांना २३ मेपर्यंत पोलिसांना शरण जाण्याचा आदेश दिला.
चिपळूण सत्र न्यायालयाने नीलेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर न्या. अजय गडकरी यांच्या सुटीकालीन न्यायालयापुढे सुनावणी होती. राणे यांच्यावर नोंदवण्यात आलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा नसून या प्रकरणाचा तपास पूर्ण होत आला आहे. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्याची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद राणे यांच्यातर्फे अ‍ॅड. राजेंद्र शिरोडकर यांनी केला. - सविस्तर वृत्त/२

Web Title: Nilesh Rane be present! : The court rejected the bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.