“मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी 45 कोटी अन् राम मंदिराला फक्त 'एक कोटी'”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 10:01 IST2020-03-08T09:53:15+5:302020-03-08T10:01:39+5:30

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून 1 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती.

Nilesh Rane attacked Uddhav Thackeray from Ram temple | “मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी 45 कोटी अन् राम मंदिराला फक्त 'एक कोटी'”

“मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी 45 कोटी अन् राम मंदिराला फक्त 'एक कोटी'”

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. तर रामलल्लाचे दर्शन घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून 1 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. याच घोषणावरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

निलेश राणे यांनी ट्वीट करत म्हंटलं आहे की, "लाज नाही वाटली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राम मंदिरासाठी फक्त एक करोड रुपये जाहीर करताना. मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी 45 कोटी पण राम मंदिराला फक्त एक कोटी दिले असल्याचा खोचक टोला निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.

तर वर्षावर न जाण्याचा निर्णयावरून सुद्धा निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. "उद्धव ठाकरे ह्यांना ही भीती आहे की, केंद्र सरकारचे किंवा पवार साहेबांचे हेर त्याठिकाणी असतील. त्यामुळे आतल्या गोष्टी बाहेर जातील आणि मग ठाकरेंचे व्यवहार कळतील त्या भीतीने उद्धव ठाकरे मातोश्री सोडणार नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

 

 

 

 

Web Title: Nilesh Rane attacked Uddhav Thackeray from Ram temple