शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

निलेश कराळे मास्तर विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक, या दोन मतदारसंघांवर ठोकला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 14:38 IST

Maharashtra Assembly Election 2024: वर्धा जिल्ह्यातील वर्धा आणि आर्वी मतदारसंघातून निवडणूक लढण्यास निलेश कराळे (Nilesh Karale) हे इच्छूक आहेत. तसेच येथून लढण्याची संधी मिळावी, अशी मागणी त्यांनी पक्षाकडे केली आहे.

सोशल मीडिया आणि युट्युबवर प्रसिद्ध असलेले कराळे मास्तर अर्थात निलेश कराळे हे  विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. निलेश कराळे यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, आता ते वर्धा जिल्ह्यातील वर्धा आणि आर्वी मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. तसेच येथून लढण्याची संधी मिळावी, अशी मागणी त्यांनी पक्षाकडे केली आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना निलेश कराळे मास्तर यांनी सांगितले की, वर्धा आणि आर्वी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा मी व्यक्त केली आहे. हे मतदारसंघ काँग्रेसचे होते. मात्र मागच्या तीन वेळा वर्धा येथे काँग्रेसचा पराभव झालेला आहे. त्यामुळे आमच्या पक्षाने या मतदारसंघावर दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाचे खासदार निवडून आले आहेत. तसेच आर्वी मतदारसंघ हा खासदारसाहेबांचाच आहे, त्यामुळे तो सध्या रिक्त आहे. वर्ध्यामधील हिंगणघाट, वर्धा आणि आर्वी हे तीन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने मागितले आहेत. हिंगणघाट शरद पवार गटाकडे आहे. उर्वरित २ मतदारसंघांवरून सध्या वाद सुरू आहे, असे कराळे म्हणाले. 

मी वर्धा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. तसेच आर्वी मतदारसंघामधूनही उमेदवारीसाठी दावा केला आहे. आता दोन पैकी एक मतदासंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला सुटू शकतो. त्याच्यावर चर्चा सुरू आहे. आता आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत त्यावर निर्णय येऊ शकतो, असे कराळे यांनी सांगितले.  

ते पुढे म्हणाले की, सध्या जी हवा वाहत आहे, ती महाविकास आघाडीच्या बाजूने वाहत आहे. तसेच दोन्ही मतदारसंघांमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार निवडून येऊ शकतात, असा विश्वासही निलेश कराळे यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसwardha-acवर्धाarvi-acआर्वी