शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘एनआयए’ची धुरा मराठी अधिकाऱ्याकडे, सदानंद दाते यांची महासंचालकपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 06:22 IST

१९९०च्या भारतीय पोलिस सेवेचे अधिकारी असलेले सदानंद दाते सध्या महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी दलाचे प्रमुख आहेत.

मुंबई : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी कामा रुग्णालयात दहशतवाद्यांशी मुकाबला करणारे भारतीय पोलिस सेवेतील महाराष्ट्र केडरचे अधिकारी सदानंद दाते यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर २०२६पर्यंत या पदावर त्यांची नियुक्ती असेल. 

१९९०च्या भारतीय पोलिस सेवेचे अधिकारी असलेले सदानंद दाते सध्या महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी दलाचे प्रमुख आहेत. याच पदावरून त्यांची एनआयएमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दाते यांच्या बॅचचे व महाराष्ट्र केडरचे भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी सध्या एनआयएमध्ये विशेष महासंचालक आहेत. कुलकर्णी यांच्यानंतर दाते हे महाराष्ट्र केडरमधून एनआयएमध्ये जाणारे दुसरे अधिकारी ठरले आहेत. 

कर्तव्यकठोर अधिकारीपोलिस दलात कर्तव्यकठोर अशी सदानंद दाते यांची प्रतिमा आहे. २०२०मध्ये स्थापन झालेल्या मीरा - भाईंदर पोलिस आयुक्तालयाचे ते पहिले पोलिस आयुक्त होते, तर मुंबईतही त्यांनी कायदा व सुव्यवस्था विभागाचे सह-आयुक्त तसेच गुन्हे शाखेचे सह-आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी पीएच. डी. संपादित केली, तसेच कॉस्ट अँड मॅनमेजमेंटचे शिक्षणही पूर्ण केले आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील त्यांची कामगिरी गाजली होती.

एनडीआरएफची धुरा आनंद यांच्याकडेराजस्थान कॅडरचे १९९० च्या बॅचचे अधिकारी राजीव कुमार शर्मा यांना पोलिस संशोधन व विकास ब्युरोचे महासंचालक, तर १९९१ च्या बॅचच्या उत्तर प्रदेश कॅडरचे पीयूष आनंद यांचे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) प्रमुख पदी नियुक्ती केली. 

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र