शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 11:33 IST

NIA Raids Update: एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये धाडी टाकल्या. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित संशयितांचा शोध घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. यात काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

NIA Raids News: जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या नेटवर्कविरोधात एनआयएने देशातील पाच राज्यांत अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. देशात २२ ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या असून, महाराष्ट्रात एनआयए आणि एटीएसने संयुक्त कारवाई केल्याची माहिती आहे.

एनआयएने कोणत्या राज्यात टाकल्या धाडी?

जैश-ए-मोहम्मद टेरर मॉड्यूल प्रकरणात एनएआयने शनिवारी पहाटे महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, आसाम आणि दिल्लीतील एकूण २२ ठिकाणी धाडी टाकल्या. लष्कराच्या जवानांवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. एनआयएने पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर जैश-ए-मोहम्मद संघटनेविरोधात एकाच वेळी देशभरात धाडी टाकल्या. 

दिल्लीत रात्रभर झाडाझडती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर पूर्व दिल्लीतील मुस्तफाबाद परिसरात एनआयएने रात्रभर धाडी टाकल्या. दिल्ली पोलीस स्पेशल सेलचे अधिकारीही या कारवाईत होते. झाडाझडतीत संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी काही लोकांना नोटिसाही बजावल्या आहेत. दोन-तीन लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

बारामुल्लामध्ये धाडसत्र

जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात संगरी परिसरात एनआयएने स्थानिक पोलिसांच्या मदतीने धाडी टाकल्या. विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर एनआयएने दहशतवाद विरोधी कारवाईला गती दिली आहे. 

एनआयएने महाराष्ट्रातील तिघांना घेतले ताब्यात

महाराष्ट्रातील काही शहरामध्येही एनआयए आणि एटीएसने संयुक्त कारवाई करत धाडी टाकल्या.

छत्रपती संभाजीनगर, जालना, मालेगाव, नाशिक या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. झाडाझडतीनंतर एनआयएने तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून काही सामुग्री जप्त करण्यात आली आहे. जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या संपर्कात हे तिघे होते, असा संशय आहे. त्यांनी टेरर फंडिंगसाठी मदत केल्याचाही आरोप आहे. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये एनआयएची धाड पडली, त्यावेळचे दृश्य.

छत्रपती संभाजीनगरमधील आझाद चौक आणि एन ६ या भागातून दोन जणांना, तर जालना शहरातील गांधीनगर भागातून एका व्यक्तीला एनआयएने ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. एनआयए, एटीएसकडून संशयितांकडील मोबाईल, लॅपटॉपचीही तपासणी केली जाणार आहे. 

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाterroristदहशतवादीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसTerrorismदहशतवाद