शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
2
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिसांना...
3
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
4
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
5
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
6
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
7
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
8
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
9
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
10
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
11
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
12
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
13
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
14
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
15
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
16
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
17
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
18
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
19
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
20
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!

पुढची दिवाळी राम मंदिरात साजरी करू, सुब्रमण्यम स्वामींनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 16:10 IST

मुंबई- पुढच्या वर्षीची दिवाळी अयोध्येतील राम मंदिरात साजरी करू, असा विश्वास भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामींनी व्यक्त केला आहे. राम मंदिर पुनर्निर्माणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

मुंबई- पुढच्या वर्षीची दिवाळी अयोध्येतील राम मंदिरात साजरी करू, असा विश्वास भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामींनी व्यक्त केला आहे. राम मंदिर पुनर्निर्माणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ते भाविकांसाठी खुलं केलं जाईल, असंही स्वामी म्हणाले आहेत.मंदिराच्या निर्माणासाठी लागणारी आवश्यक सामग्रीही तयार आहे. पुढील वर्षी ऑक्टोबरपर्यंत राम मंदिर तयार असेल, राम मंदिराला मग स्वामी नारायण मंदिराप्रमाणे जोडणे बाकी राहील,’ असेही स्वामींनी स्पष्ट केलं आहे. राम मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी नव्या कायद्याची आवश्यकता नाही. आम्ही राम मंदिरासाठी नवा कायदा करू शकतो. परंतु आम्हाला त्याची सर्व गोष्टींची आवश्यकता वाटत नाही. त्याचं कारणही तसंच आहे. आम्ही हा खटला नक्कीच जिंकू असा आम्हाला विश्वास आहे, असंही स्वामी म्हणाले आहेत.अलाहाबाद उच्च न्यायालयात या विषयावर पूर्वीच खूप सखोल चर्चा झाली आहे. त्यामुळे सुन्नी वक्फ बोर्डाकडे राम मंदिर पुनर्निर्माणात आडकाठी आणण्याचं म्हणावं तसं कारण आता राहिलं नाही. अयोध्येतील राम जन्मभूमीवर उभारण्यात आलेली बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेला 6 डिसेंबर 2017ला 25 वर्षं पूर्ण होत असून, त्याच पार्श्वभूमीवर स्वामींच्या विधानाला राजकीय स्तरावर महत्त्व प्राप्त झालं आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर केवळ राम मंदिरच उभारण्यात येईल तेथे अन्य काही उभारले जाता कामा नये, असे प्रतिपादन गेल्या आठवड्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह मोहन भागवत यांनी केले होते.विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या धर्म संसदेत हिंदू धर्मातील संत तसेच मठप्रमुख, साधू अशा सुमारे दोन हजार जणांपुढे बोलताना भागवत म्हणाले की, अयोध्येत जे दगड आणण्यात आले आहेत, त्यातूनच आपल्याला राम मंदिर उभारायचे आहे. ते मंदिर उभारले जाईल आणि त्यावर भगवा फडकेल, असा दिवस जवळ आला आहे. अनेक वर्षांची तपश्चर्या, प्रयत्न आणि त्याग या सा-यांमुळेच राम मंदिर उभारणे आता शक्य होत आहे. अर्थात हे प्रकरण न्यायालयप्रविष्ट आहे, हेही आपण लक्षात ठेवायला हवे. त्यामुळे राम मंदिरासाठी सर्वांनी मिळून जनजागृती करणे आवश्यक आहे, असेही मोहन भागवत यांनी बोलून दाखवले होते.

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीRam Mandirराम मंदिरBJPभाजपाMohan Bhagwatमोहन भागवत