लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने साकारण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘वृत्तपत्र विक्रेता बंधंूच्या शिल्पकृतीचे’ लोकार्पण मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते गजानन मेश्राम यांच्या हस्ते नागपुरात करण्यात आले. संविधान चौकात झालेल्या या सोहळ््याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व खासदार विजय दर्डा, लोकमत मीडिया प्रा. लि.चे कार्यकारी संचालक करण दर्डा, आ. अनिल सोले, आ. सुधाकरराव देशमुख, आ. कृष्णा खोपडे, काँग्रेस नेते अनिस अहमद, आ. आशिष देशमुख, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने, उद्योजक दिलीप छाजेड, लोकमत नागपूर युनिटचे हेड नीलेश सिंह, उपमहाव्यवस्थापक (विशेष प्रकल्प) आशिष जैन आणि मान्यवर उपस्थित होते.
‘वृत्तपत्र विक्रेता बंधू शिल्पकृती ’
By admin | Updated: January 7, 2015 01:17 IST