पंढरपूरातील रोपळेत नव-याने केला बायको व मुलीचा खून
By Admin | Updated: July 21, 2016 10:48 IST2016-07-21T10:48:42+5:302016-07-21T10:48:42+5:30
कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि मुलीचा डोक्यात पाईप मारुन खून केला. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली.

पंढरपूरातील रोपळेत नव-याने केला बायको व मुलीचा खून
ऑनलाइन लोकमत
रोपळे, दि. २१ - कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि मुलीचा डोक्यात पाईप मारुन खून केला. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. वृषाली प्रशांत वट्टमवार आणि द्यानेश्वरी प्रशांत वट्टमवार असे मृत मायलेकीची नावे आहेत.
याबाबत पोलिसानी सांगितलेली माहिती अशी की, गेल्या अनेक दिवसापासून नवरा बायकोत कौटुंबिक कारणावरुन भांडण सुरु होते.
त्याच वादातून आज पहाटे प्रशांत वट्टमवार याने दोघी झोपल्या असताना त्यांच्या डोक्यात लोखंडी पाइपने वार करुन ठार केले. त्यानंतर त्याने स्वत:हून पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले.