नागपूरकरांसाठी ‘न्यू ईयर गिफ्ट’

By Admin | Updated: January 1, 2015 01:30 IST2015-01-01T01:30:25+5:302015-01-01T01:30:25+5:30

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूरकरांसाठी चांगली बातमी. महानगरपालिका हद्दीमध्ये पेट्रोल व डिझेलवर करण्यात येणारी अतिरिक्त ‘व्हॅट’ वसुली समाप्त झाल्यामुळे याचे दर कमी झाले आहेत.

'New Year Gift' for Nagpur | नागपूरकरांसाठी ‘न्यू ईयर गिफ्ट’

नागपूरकरांसाठी ‘न्यू ईयर गिफ्ट’

पेट्रोल-डिझेल स्वस्त : अतिरिक्त ‘व्हॅट’ वसुली बंद
नागपूर : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूरकरांसाठी चांगली बातमी. महानगरपालिका हद्दीमध्ये पेट्रोल व डिझेलवर करण्यात येणारी अतिरिक्त ‘व्हॅट’ वसुली समाप्त झाल्यामुळे याचे दर कमी झाले आहेत. पेट्रोलचे दर १ टक्का तर डिझेलची किंमत ३ टक्क्यांनी घटली आहे.
राज्य शासनाने नागपूर महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यासच्या माध्यमातून शहरात ‘आयआरडीपी’ (इंटिग्रेटेड रोड डेव्हलपमेंट प्रोग्राम) सुरू करताना ३५० कोटी रुपये खर्च केले होते. हा खर्च वसूल करण्यासाठी पेट्रोल व डिझेलवर २०१२ सालापासून अतिरिक्त ‘व्हॅट’ वसुली करण्यात येत होती. ही वसुली ३१ डिसेंबर २०१४ पर्यंतच करण्यात येणार होती. याला आता समाप्त करण्यात आले आहे. राज्य शासनाने यासंबंधात अधिसूचना जारी केली आहे.
पेट्रोल-डिझेलचे नवे दर
इंधनजुना दरनवे दर
पेट्रोल७०.९६७०.४०
डिझेल६०.९६५९.४४

Web Title: 'New Year Gift' for Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.