शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

Corona Delta Variant: लवकरच डेल्टाविषयी नवी उपचारपद्धती; राज्य कोरोना टास्क फोर्स ठरविणार मार्गदर्शक तत्त्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 08:42 IST

Corona Delta Variant treatment: पालिकेचे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. रमेश भारमल सांगितले, सध्या कोरोनावरील उपचारपद्धती साऱखीचे आहे, मात्र लवकरच राज्याचा आरोग्य विभाग , कोरोना टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञ याविषयी नवीन उपचारपद्धतीचे धोऱण निश्चित कऱणार आहे.

- स्नेहा मोरेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : डेल्टा प्लस करोना विषाणूचे बदललेले स्वरूप आहे. करोनासाठी जी वैद्यकीय उपचार पद्धती दिली जाते, तीच उपचार पद्धती या विषाणूवरही मदतगार ठरू शकेल, अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवली जात होती. आता मात्र लवकरच राज्य कोरोना टास्क फोर्स डेल्टा प्लस या म्युंटटवरील नवी उपचारपद्धती विषयी मार्गदर्शक तत्वे जाहीर कऱणार आहेत. त्यानंतर ही उपचारपद्धती स्थानिक आणि जिल्हा प्रशासनाला कळविण्यात येणार असल्याची माहिती आऱोग्य विभागाने दिली आहे.

पालिकेचे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. रमेश भारमल सांगितले, सध्या कोरोनावरील उपचारपद्धती साऱखीचे आहे, मात्र लवकरच राज्याचा आरोग्य विभाग , कोरोना टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञ याविषयी नवीन उपचारपद्धतीचे धोऱण निश्चित कऱणार आहे. डेल्टा विषाणू हा अधिक संसर्गकारक आहे. त्यामुळे कटुंबातील सर्व व्यक्तींमध्ये चटकन पसरतो. तो आधीच्या स्ट्रेनपेक्षा शरीरात लवकर पसरतो. त्यामुळे आजाराची लक्षणे चार ते पाच दिवसांत दिसू लागतात. या स्ट्रेनचा संसर्ग झाल्यास औषधोपचार हे करोनाच्या उपचारपद्धतीसारखेच आहेत. मास्क वापरणे, हात धुणे आणि गर्दीत न जाणे ही त्रिसूत्री पाळणे गरजेचे आहे.

डेल्टा हा करोना विषाणूचा जनुकीय बदल झाल्यामुळे तयार झालेला प्रकार आहे. या विषाणूत असे बदल नियमित होत असतात. त्याची संसर्गक्षमता आता वाढल्याने पूर्वी जी लक्षणे सहा ते सात दिवसांनी दिसायची, ती आता संसर्गानंतर लवकर दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळ न दवडता त्वरित डॉक्टरांकडे गेल्यास लक्षणांची तीव्रता वाढणार नाही, याकडे सूक्ष्मजीवशास्त्र अभ्यासक डॉ. निलेश कर्णिक यांनी लक्ष वेधले.

जनुकीय तपासणी गरजेचीआरटीपीसीआर तपासणी करून रोगनिदान करणे शक्य आहे का, तसेच सध्याचा औषधोपचार बदलणे गरजेचे आहे का, यासाठी ही तपासणी केली जाते. लसीकरणामुळे निर्माण होणारी रोगप्रतिकारशक्ती पुरेशी आहे का, रोगाच्या लक्षणांमध्ये तसेच रोगप्रसाराच्या पद्धतीमध्ये काही बदल आहे का, विषाणू किती घातक झाला आहे, नवीन लस तयार करण्याची गरज भासणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरे ही जनुकीय अभ्यासातून मिळू शकतात. त्यामुळे या विषाणूच्या तपासणीसाठी जनुकीय तपासणी करण्यात येत आहे 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस