Corona Delta Variant: लवकरच डेल्टाविषयी नवी उपचारपद्धती; राज्य कोरोना टास्क फोर्स ठरविणार मार्गदर्शक तत्त्वे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 08:42 AM2021-08-25T08:42:15+5:302021-08-25T08:42:26+5:30

Corona Delta Variant treatment: पालिकेचे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. रमेश भारमल सांगितले, सध्या कोरोनावरील उपचारपद्धती साऱखीचे आहे, मात्र लवकरच राज्याचा आरोग्य विभाग , कोरोना टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञ याविषयी नवीन उपचारपद्धतीचे धोऱण निश्चित कऱणार आहे.

New treatments for Corona Delta Variant; Guidelines to be decided by the StateTask Force | Corona Delta Variant: लवकरच डेल्टाविषयी नवी उपचारपद्धती; राज्य कोरोना टास्क फोर्स ठरविणार मार्गदर्शक तत्त्वे

Corona Delta Variant: लवकरच डेल्टाविषयी नवी उपचारपद्धती; राज्य कोरोना टास्क फोर्स ठरविणार मार्गदर्शक तत्त्वे

Next

- स्नेहा मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : डेल्टा प्लस करोना विषाणूचे बदललेले स्वरूप आहे. करोनासाठी जी वैद्यकीय उपचार पद्धती दिली जाते, तीच उपचार पद्धती या विषाणूवरही मदतगार ठरू शकेल, अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवली जात होती. आता मात्र लवकरच राज्य कोरोना टास्क फोर्स डेल्टा प्लस या म्युंटटवरील नवी उपचारपद्धती विषयी मार्गदर्शक तत्वे जाहीर कऱणार आहेत. त्यानंतर ही उपचारपद्धती स्थानिक आणि जिल्हा प्रशासनाला कळविण्यात येणार असल्याची माहिती आऱोग्य विभागाने दिली आहे.

पालिकेचे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. रमेश भारमल सांगितले, सध्या कोरोनावरील उपचारपद्धती साऱखीचे आहे, मात्र लवकरच राज्याचा आरोग्य विभाग , कोरोना टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञ याविषयी नवीन उपचारपद्धतीचे धोऱण निश्चित कऱणार आहे. डेल्टा विषाणू हा अधिक संसर्गकारक आहे. त्यामुळे कटुंबातील सर्व व्यक्तींमध्ये चटकन पसरतो. तो आधीच्या स्ट्रेनपेक्षा शरीरात लवकर पसरतो. त्यामुळे आजाराची लक्षणे चार ते पाच दिवसांत दिसू लागतात. या स्ट्रेनचा संसर्ग झाल्यास औषधोपचार हे करोनाच्या उपचारपद्धतीसारखेच आहेत. मास्क वापरणे, हात धुणे आणि गर्दीत न जाणे ही त्रिसूत्री पाळणे गरजेचे आहे.

डेल्टा हा करोना विषाणूचा जनुकीय बदल झाल्यामुळे तयार झालेला प्रकार आहे. या विषाणूत असे बदल नियमित होत असतात. त्याची संसर्गक्षमता आता वाढल्याने पूर्वी जी लक्षणे सहा ते सात दिवसांनी दिसायची, ती आता संसर्गानंतर लवकर दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळ न दवडता त्वरित डॉक्टरांकडे गेल्यास लक्षणांची तीव्रता वाढणार नाही, याकडे सूक्ष्मजीवशास्त्र अभ्यासक डॉ. निलेश कर्णिक यांनी लक्ष वेधले.

जनुकीय तपासणी गरजेची
आरटीपीसीआर तपासणी करून रोगनिदान करणे शक्य आहे का, तसेच सध्याचा औषधोपचार बदलणे गरजेचे आहे का, यासाठी ही तपासणी केली जाते. लसीकरणामुळे निर्माण होणारी रोगप्रतिकारशक्ती पुरेशी आहे का, रोगाच्या लक्षणांमध्ये तसेच रोगप्रसाराच्या पद्धतीमध्ये काही बदल आहे का, विषाणू किती घातक झाला आहे, नवीन लस तयार करण्याची गरज भासणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरे ही जनुकीय अभ्यासातून मिळू शकतात. त्यामुळे या विषाणूच्या तपासणीसाठी जनुकीय तपासणी करण्यात येत आहे
 

Web Title: New treatments for Corona Delta Variant; Guidelines to be decided by the StateTask Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.