कोकण रेल्वेच्या माहितीसाठी नवीन टोल फ्री नंबर

By Admin | Updated: January 28, 2015 05:09 IST2015-01-28T05:09:33+5:302015-01-28T05:09:33+5:30

कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या ट्रेनची माहिती देण्यासाठी १८00२३३१३३२ हा नवीन नंबर उपलब्ध करण्यात आला आहे.

New toll free number for Konkan Railway information | कोकण रेल्वेच्या माहितीसाठी नवीन टोल फ्री नंबर

कोकण रेल्वेच्या माहितीसाठी नवीन टोल फ्री नंबर

मुंबई : कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या ट्रेनची माहिती देण्यासाठी १८00२३३१३३२ हा नवीन नंबर उपलब्ध करण्यात आला आहे. यापूर्वी २६ जानेवारीपासून हा नंबर उपलब्ध करण्यात आल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले.
ट्रेनची संपूर्ण माहिती कोकण रेल्वे प्रवाशांना उपलब्ध व्हावी, यासाठी कोकण रेल्वेकडून १८00२६६१३३२ हा नंबर उपलब्ध करण्यात आला होता. या नंबरमध्ये आता बदल करून त्याऐवजी दुसरा नंबर उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी १८00२३३१३३२ हा नवीन नंबर असल्याचे कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी सांगितले. रोहा ते ठाकूरदरम्यान धावणाऱ्या कोकण रेल्वेच्या गाड्यांची सद्य:स्थिती समजण्यासाठी हा नंबर असेल, असे सांगण्यात आले. या नंबरवर फक्त गाड्यांची माहिती मिळेल. रिफंड, उपलब्ध आसन क्षमता, कन्फर्म तिकीट किंवा अन्य माहिती येथे मिळणार नाहीे.

Web Title: New toll free number for Konkan Railway information