शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

मोठी घोषणा! महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण; ना महायुती, ना मविआ, विधानसभेला तिसरा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 16:01 IST

येत्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेला नवा पर्याय म्हणून आम्ही सामोरे जाणार आहोत अशी घोषणा संभाजीराजेंनी केली आहे.

मुंबई - महायुती आणि महाविकास आघाडी हे एकाच नाण्याच्या  २ बाजू आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला पर्याय म्हणून आम्ही पुढे येत आहोत. सामान्य व्यक्तीला त्यांच्या हक्काचं बटण देण्याचं काम आम्ही करणार आहोत. लोकसभेत जनतेनं जो निर्णय दिला त्यावर विधानसभेत पुढे जाऊ असं कुणाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे असं सांगत महाराष्ट्रात नवीन समीकरण उदयास आलं आहे. छत्रपती संभाजीराजे आणि राजरत्न आंबेडकर यांच्यासोबत इतर संघटना लवकरच नवा पर्याय देत निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी केली आहे. 

मुंबईत छत्रपती संभाजीराजे आणि राजरत्न आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यात संभाजीराजे म्हणाले की, महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आता सुसंस्कृत राहिलाय का हे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. या ७५ वर्षात  नुसत हेवदावे सुरू आहे. महाराष्ट्र कसा घडवू शकतो?, महाराष्ट्र इतरांना दिशा देण्याचं काम करतो. सध्या लोक अस्वस्थ आहेत. लोकसभेत जनतेनं जो निर्णय दिला त्यावर विधानसभेत पुढे जाऊ असं कुणाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. मागील १५-२० दिवसांत जनतेच्या व्यथा समजल्यानंतर आम्ही एक वेगळा पर्याय, ज्यातून सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेन आमचा प्रवास सुरू झाला आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच प्रहारचे बच्चू कडू यांच्यासोबतही आमची बोलणी सुरू आहेत. काही मुद्द्यांवर एकमत होण्यासाठी आणखी २ बैठका घ्याव्या लागतील.  बाबासाहेब आंबेडकरांचे पणतु राजरत्न आंबेडकर आमच्यासोबत आलेत. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने पुढे जायचे आहे. जय जवान, जय किसान पक्ष आमच्यासोबत आला आहे. ही चांगली सुरुवात आहे. राजू शेट्टींसोबत आमचे बोलणे सुरू आहे. शेतकऱ्यांचे सगळे घटक कसे येतील, वेगळा पर्याय देता येईल यावर चर्चा झाली. मनोज जरांगे पाटील यांच्याशी सकारात्मक बोलणी झाली. आपल्याला पाडायचं नाही तर निवडून कसं आणता येईल यावर बोलणं झालं. त्यांचा उद्देश आणि आमचा उद्देश एकच आहे. गरीब मराठ्यांनाही आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे. जरांगे सकारात्मक निर्णय घेतील ही अपेक्षा आहे असंही छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं. 

दरम्यान, निवडणूक लांबल्या आहेत, पुढची तारीख अजून जाहीर झाली नाही. जितके चांगले लोक आम्हाला जोडले जातील त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. बच्चू कडू, राजू शेट्टी, मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांशीही संवाद सुरू आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चांगला पर्याय महाराष्ट्रासमोर देणार आहोत. जरांगे पाटील सध्या सगळ्यांचा अंदाज घेतायेत. ते सकारात्मक निर्णय घेतील. महायुती, महाविकास आघाडी यांना पर्याय म्हणून आम्ही नवा पर्याय लोकांसमोर देणार आहोत अशी माहिती संभाजीराजेंनी पत्रकार परिषदेत दिली. 

अनुसूचित जातीतील लोक अन् मुस्लिमांची फसवणूक

आज जे काही महाराष्ट्रात बघत आहोत, बाबासाहेबांचा इतिहास वाचला तर लहानपणी ते चाळीत राहायचे, रात्री २ ते पहाटे ५ पर्यंत ते अभ्यास करत होते. कारण ५ वाजता पाणी यायचे, तेव्हा नळावरची भांडणे सुरू व्हायची. त्या गोंधळात अभ्यास शक्य नसायचा. आज महाराष्ट्रात नेमकी तीच परिस्थिती आहे. नळावरची भांडणे सुरू आहेत. जोडेमारो आंदोलन, वैयक्तिक द्वेषातून हे सगळे सुरू आहे. लोकसभेत संविधान धोक्यात आहे असा प्रचार केला गेला, भारताचे संविधान धोक्यात आहे हे वाचवण्यासाठी इंडिया आघाडी, महाविकास आघाडीला भरभरून मतदान दिले. परंतु ज्यावेळी खरेच जेव्हा संविधानाला धोका आहे, मग वक्फ बोर्डाचा मुद्दा असो, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा प्रश्न असो कुणीही एक प्रश्न विचारत नाही. अनुसूचित जातीतील, मुस्लीम समाजाला आज त्यांची फसवणूक झालीय असं वाटायला लागलं आहे. महायुती हटवायची असेल तर महाविकास आघाडी आणि मविआ हटवायचे असेल तर महायुती आणा हा जो खेळ सुरू आहे तो थांबला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला एक पर्याय म्हणून नवीन समीकरण पुढे येत आहे असं विधान राजरत्न आंबेडकरांनी यावेळी पत्रकार परिषदेत केले.  

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Raju Shettyराजू शेट्टीBacchu Kaduबच्चू कडूManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील