‘सुराज्याची दोन वर्षे’ भाजपाचे नवे अभियान

By Admin | Updated: October 31, 2016 05:44 IST2016-10-31T05:44:52+5:302016-10-31T05:44:52+5:30

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला सोमवारी (३१ आॅक्टोबर) दोन वर्षे पूर्ण होत असताना आता प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘सुराज्याची दोन वर्षे’ हे अभियान राज्यभर राबविण्यात येणार

New BJP campaign for 'Surajya two years' | ‘सुराज्याची दोन वर्षे’ भाजपाचे नवे अभियान

‘सुराज्याची दोन वर्षे’ भाजपाचे नवे अभियान


मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला सोमवारी (३१ आॅक्टोबर) दोन वर्षे पूर्ण होत असताना आता प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘सुराज्याची दोन वर्षे’ हे अभियान राज्यभर राबविण्यात येणार आहे. आ. मंगलप्रभात लोढा
हे या अभियानाचे संयोजक असतील.
राज्य सरकारने घेतलेले विविध लोकोपयोगी निर्णय आणि
योजनांची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नोव्हेंबर ते जानेवारी असे तीन महिने
‘सुराज्य रथ’ राज्यभर फिरणार आहे. त्यावर एक मोठा स्क्रीन असेल
आणि त्याद्वारे सर्व माहिती दिली जाईल.
जिल्हा व मंडळ स्तरावर प्रत्येकी दोन सदस्यांची निवड करून त्यांच्याकडे हे अभियान
राबविण्याची जबाबदारी
दिली जाईल. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: New BJP campaign for 'Surajya two years'