शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अजिबात ३४च्या खाली नको; भाजप नेत्यांचा दिल्लीत दबाव; जागावाटप अद्याप अनिश्चित; सेना, राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण

By यदू जोशी | Updated: March 8, 2024 06:53 IST

...दुसरीकडे भाजप नेत्यांनी काहीही झाले तरी ३४ पेक्षा कमी जागा घेऊ नका, असा दबाव श्रेष्ठींवर वाढविल्याची खात्रीलायक माहिती आहे.

यदु जोशी -

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने राज्यातील ३५ उमेदवारांची यादी तयार केल्याची बातमी असताना, नाराज झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सन्मानजनक जागा देण्याचा आग्रह भाजपश्रेष्ठींकडे धरला. दुसरीकडे भाजप नेत्यांनी काहीही झाले तरी ३४ पेक्षा कमी जागा घेऊ नका, असा दबाव श्रेष्ठींवर वाढविल्याची खात्रीलायक माहिती आहे.

भाजप ३२ ते ३७ जागा लढणार असून १३ ते १६ जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना सोडणार असल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या. प्रदेश व केंद्रीय भाजपने विविध कंपन्यांकडून सहा महिन्यांत सूक्ष्म सर्वेक्षणे केली. त्यासह भाजप व रा. स्व. संघाच्या यंत्रणेच्या फिडबॅकद्वारे ३५ जागा लढवाव्यात, अशी मागणी  नेत्यांनी श्रेष्ठींकडे केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे,  सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटले. त्यावेळी, या नेत्यांनी ‘आमची मागणी ३५ चीच आहे, आणखी एक जागा मित्रपक्षांना सोडा, पण ३४ जागा लढवायलाच हव्यात’ असा आग्रह धरल्याची माहिती आहे.

जागावाटप वास्तविकतेवरचजागावाटपाचा निर्णय वास्तविकतेच्या आधारित होईल. महायुतीत जागावाटपाबाबत  गंभीर मतभेद नाहीत. दोन ते तीन जागांवर चर्चा सुरु असून जागावाटप लवकर मार्गी लागेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सध्याची जागांची आकडेवारी निराधार आणि विविध माध्यमांमध्ये आलेले आकडे योग्य नाहीत,  असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी ‘लोकमत’ला सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आम्हाला एक-दोन दिवसांत दिल्लीत बोलविले आहे. त्यानुसार आता आम्ही तिन्ही पक्ष दिल्लीत जाऊन चर्चा करू, असेही पटेल म्हणाले.शिवसेनेला नऊ वा दहा जागा मिळणार अशा बातम्या आल्यानंतर, काही नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विचारणा केली. सध्या काहीही ठरले नाही. आपले १३ खासदार आहेत. तेवढ्या वा अधिक जागेचा प्रयत्न करू, असे शिंदेंनी नेत्यांना सांगितले. सध्याची आकडेवारी निराधार असल्याचे सेनेच्या खासदाराने ‘लोकमत’ला सांगितले. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस