शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात स्वच्छ भारत अभियानाचा निव्वळ फार्स

By admin | Updated: November 16, 2014 23:35 IST

घाणीचे साम्राज्य : कायमस्वरुपी स्वच्छतेच्या यंत्रणेची मागणी; ठेकेदारांचे सफाई कर्मचारी फिरकत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी

अशोक पाटील - इस्लामपूर --माजी मंत्री आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा अभियान राज्यभरात राबवले. यासाठी मोठ्या रकमेची बक्षिसेही होती. तरीसुध्दा इस्लामपूर शहरात घाणीचे साम्राज्य कायम होते. सध्याचीही परिस्थिती तशीच आहे. केंद्र सरकारने संत गाडगेबाबा अभियानाला खो देऊन आता स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. इस्लामपूर पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीलाही या अभियानाचा साक्षात्कार झाला आहे. त्यांनी केवळ प्रसिध्दीसाठी प्रभागनिहाय स्वच्छता अभियानाचा फार्स केला आहे. मोदी यांच्या संकल्पनेतून आलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा उपक्रम इस्लामपूर पालिकेने राबविण्याचे ठरवले आहे. १४ ते २0 नोव्हेंबरअखेर हा उपक्रम प्रत्येक प्रभागातून राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पक्षप्रतोद विजय पाटील, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे, मुख्याधिकारी नीलेश देशमुख आणि काही नगरसेवकांनी हातात खोरे घेऊन गेल्या २५ वर्षांपासून साचलेली घाण उपसण्यास सुरुवात केली आहे. हे नेते केवळ छायाचित्र काढेपर्यंत नाला साफ करण्याचा फार्स करीत आहेत, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून आहे.सर्वसामान्यांच्या मते केवळ एक दिवसाचा उपक्रम राबवून शहरातील स्वच्छता होणार नाही. यासाठी दररोज पालिकेने स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शहरात साठलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली आहे. यातूनच डेंग्यूसारख्या साथीने थैमान घातले आहे. काही प्रभागातील गटारी वर्षानुवर्षे तुंबल्या आहेत. स्वच्छता ठेकेदाराचे कर्मचारी सफाईसाठी फिरकतही नाहीत. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या गटारी तुंबून त्यातील पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. सत्ताधारी भुयारी गटारींची भाषा करत आहेत. त्या अंमलात कधी येणार? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्यात राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मोदींच्या या अभियानाचा पुळका राष्ट्रवादीला आल्याचे दिसते, अशीही भावना काही नागरिकांनी व्यक्त केली.शहर स्वच्छतेस शुक्रवारपासून प्रारंभ..!पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्याहस्ते १४ नोव्हेंबरला महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. हा उपक्रम २0 नोव्हेंबरअखेर सुरु राहणार असून शहरातील सर्व प्रभागात ही मोहीम राबविली जाणार आहे. उद्घाटनावेळी नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, नगरसेवक चंद्रकांत पाटील, बी. ए. पाटील, सौ. अरुणादेवी पाटील, छाया देसाई, सुभाष देसाई, शहाजी पाटील, विजय कोळेकर, रणजित मंत्री, संदेश शहा, सदानंद पाटील, रवी सूर्यवंशी, अभिजित कुर्लेकर, जालिंदर कोळी उपस्थित होते.स्वच्छता अभियान हे काही तासांसाठी करुन चालणार नाही. शहरामध्ये प्रचंड कचरा साठलेला आहे. तो कचरा युध्दपातळीवर हटवला पाहिजे. नियमितपणे शहराची स्वच्छता केली पाहिजे. शहरातील गटारी तुंबलेल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावरुन वाहते. भुयारी गटार योजनेचे स्वप्न स्वप्नच राहणार आहे.- बाबासाहेब सूर्यवंशी, माजी नगरसेवक