Neither Hindutva nor secularism in Dussehras shiv sena speech BJPs strong retaliation against Uddhav Thackeray | "दसऱ्याच्या भाषणात ना धड हिंदुत्व, ना धड धर्मनिरपेक्षता"; उद्धव ठाकरेंवर भाजपाचा जोरदार पलटवार

"दसऱ्याच्या भाषणात ना धड हिंदुत्व, ना धड धर्मनिरपेक्षता"; उद्धव ठाकरेंवर भाजपाचा जोरदार पलटवार

 मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दसऱ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही शिवसैनिकांना संबोधित केले. मात्र, यावेळी कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर ते दादर येथील सावरकर सभागृहात बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) जबरदस्त हल्ला चढवला. त्यांनी हिंदुत्व, कोरोना लस, बिहार निवडणूक, सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधला. यानंतर आता भाजपनेही उद्धव ठाकरेंवर पलटवर केला आहे.

"शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे, केवळ गडबड गोंधळलेल्या पक्षप्रमुखाच्या भाषणाचा उत्तम नमुना होता. त्यांच्या भाषणात ना धड हिंदुत्व होतं, ना धड विकास होता, ना धड धर्मनिरपेक्षता होती. मी त्यांना सांगू इच्छितो, की काळ्या टोपी खाली मेंदू असतोच, पण तो मेंदू सत्ता मिळावी म्हणून टोप्या फिरवणारा नसतो, असा पलटवार भाजप आमदार अतुल भाटखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केला आहे. 

घंटा बडवा, थाळ्या वाजवा, इतकेच तुमचे हिंदुत्व, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

भटखळकर म्हणाले, "ज्यांनी कसाबला बिरयानी दिली त्यांच्यासोबत आम्ही नाही. आम्ही याकूब मेननच्या माफीची मागणी करणाऱ्यांसोबत नव्हतो. ज्या शेतकऱ्यांचे राज्यात मोठे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांवर तर उद्धव ठाकरे बोललेच नाही." मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणा दरम्यान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर जोबरदस्त निशाणा साधला होता. उद्धव यांनी त्यांना 'काळी टोपी' वाले, म्हणून संबोधित केले होते.

घंटा बडवा, थाळ्या वाजवा, इतकेच तुमचे हिंदुत्व, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

राम कदम यांचाही हल्लाबोल -
भाजप आमदार राम कदम यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 'शिवसेनेने सावरकर सभागृहात दसरा मेळाव्याचे आयोजन करून हिंदुत्वाबद्दलचे धडे दिले. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एका शब्दानेही सावरकरांची प्रशंसा का केली नाही, हा प्रश्न आहे. बहुधा ते आपल्या नव्या मित्रांना घाबरत असावेत. त्यांचे नवे मित्र सावरकरांबद्दल वारंवार अपमानास्पद विधानं करतात,' असं कदम म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्कजवळील सावरकर राष्ट्रीय स्मारकात घेण्यात आला. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिला दसरा मेळावा  होता. शिवाय, कोरोनासह राज्यात विविध  मुद्यांवरून सरू असलेल्या राजकी्य  घमासानाबाबत ठाकरे काय  भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता होती. राज्यपाल-मुख्यमंत्री संघर्ष, जीएसटी, बिहारचं राजकारण, सुशांतसिंह मृत्यू प्रकरण, कंगना रनौतवरून निर्माण झालेला वादंग, आदी मुद्द्यांवरही त्यांनी यावेळी भाष्य केले. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Neither Hindutva nor secularism in Dussehras shiv sena speech BJPs strong retaliation against Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.