अंगावरच्या हळदीसह नववधू बेपत्ता !

By Admin | Updated: July 16, 2016 12:35 IST2016-07-16T12:29:03+5:302016-07-16T12:35:42+5:30

लग्न होऊन आठवड्याचाही कालावधी उलटत नाही तोच अंगावरच्या हळदीसह नववधू गायब झाल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली.

Neighbors disappear with hood! | अंगावरच्या हळदीसह नववधू बेपत्ता !

अंगावरच्या हळदीसह नववधू बेपत्ता !

>ऑनलाइन लोकमत
बीड, दि. १६ - लग्न होऊन आठवड्याचाही कालावधी उलटत नाही तोच अंगावरच्या हळदीसहच नववधू गायब झाली. यासंदर्भात नवरदेवाने थेट पोलीसात तक्रार दिली असून पोलीस आता या नववधूचा शोध घेत आहेत.
 
गांधनवाडी गावातील ठकराम खेंगरे या तरूणाचा आठ दिवसापूर्वीच विवाह झाला होता. घरातील विविध धार्मिक कार्ये सुरूच होती. दरम्यान नववधूने आपली तब्यत बरी नाही, असे सांगितल्याने ठकराम याने तिला घेऊन नजिकच्या अंमळनेर येथील खासगी रूग्णालय गाठले. डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर तिने त्याला औषधे कसे घ्यायचे, हे आपल्या लक्षात राहिले नाही, डॉक्टरांना विचारून या, असे सांगितले. ठकराम डॉक्टरांकडे गेला आणि अवघ्या पाच मिनिटात परतल्यावर त्याला पत्नी जागेवर नसल्याचे दिसले. या नंतर त्याने आजुबाजुला शोध घेतला परंतु ती काही त्याला सापडलीच नाही. अखेर दिवसभर शोधाशोध केल्यानंतर त्याने पोलीसात धाव घेऊन पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली.
 
 
 

Web Title: Neighbors disappear with hood!