मुंबई - दहीहंडी दिवशी आमदार राम कदम यांनी बेताल वक्तव्य करून पक्षाच्या अडचणी वाढवल्याचे प्रकरण ताजे असतानाच भाजपा अजून एका अडचणीत सापडला आहे. बुलडाणा येथील भाजपाच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात अभिनेत्री नेहा पेंडसे हिला कार्यकर्त्यांकडून धककाबुक्कीचा प्रकार घडल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. अभिनेत्री नेहा पेंडसे ही भाजपाच्या दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे पाहुणी म्हणून उपस्थित होती. या कार्यक्रमावेळी उपस्थितांनी नेहा पेंडसे हिच्यासोबत फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली. यावेळी नेहा त्यांना लांब राहून फोटो काढण्याची विनंती करत होती. मात्र जास्त गर्दी झाल्याने तिला धक्काबुक्की झाली. या प्रकारानंतर नेहा हिचा संताप अनावर झाला होता.
भाजपाच्या दहीहंडीच्या मंचावर अभिनेत्री नेहा पेंडसेला धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 22:27 IST