शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

NEET: नीट परीक्षेचे मार्क वाढवून देतो, पैसे द्या; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 11:57 IST

नीट परीक्षा घेणाऱ्या व्यवस्थापनात आपली ओळख असून जर तुमच्या पाल्याचे गुण वाढवून हवे असतील तर पैसे द्या, अशी मागणी करणाऱ्या दोघांना अटक झाली.

मुंबई: नीट परीक्षा घेणाऱ्या व्यवस्थापनात आपली ओळख असून जर तुमच्या पाल्याचे गुण वाढवून हवे असतील तर पैसे द्या, अशी मागणी करणाऱ्या दोघांना सीबीआयने अटक केली आहे.  यांपैकी एका आरोपीचे नाव संदीप शहा असून, तो सोलापूरचा रहिवासी आहे, तर दुसऱ्या व्यक्तीचे नाव सलीम पटेल असून, तो नवी मुंबईचा आहे. सलीम पटेल याची नवी मुंबईत शैक्षणिक संस्था आहे. 

या दोन आरोपींच्या वतीने गुण वाढवून देण्याचे प्रलोभन दाखवत पालकांना गंडा घातला जात असल्याचे समजल्यावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने संदीप शहा याच्याशी संपर्क साधत मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याची भेट घेतली. 

सीबीआयच्या अधिकाऱ्याने, तो पालक असून त्याच्या मुलाचे गुण वाढवायचे असल्याचे शहा याला सांगितले. शहा याने हे काम करण्यासाठी ९० लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ही रक्कम ८७ लाख ५० हजार रुपये इतकी निश्चित झाली. नीट परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वी सहा तास अगोदर मी गुण वाढवून देईन, असे आश्वासनही त्याने दिले.

या दोघांचे मोबाइल फोन जप्त करण्यात आले असून ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. त्यांच्यामध्ये अनेक वेळा संवाद झाला असून, अनेकांची गुणपत्रिका, प्रवेश पत्रिकांचे फोटो त्यांच्या मोबाइलमध्ये आढळून आले.

असा अडकला... शहा याने यापूर्वी एका पालकाकडून  २५ लाख रुपये स्वीकारल्याची माहिती सीबीआयकडे होती. या चर्चेनंतर सीबीआयच्या अधिकाऱ्याने स्वतःची ओळख सांगत त्याला या २५ लाख रुपयांसदर्भात विचारणा केली. त्यावेळी शहा याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर सीबीआयने त्याला अटक केली. त्याच्या चौकशीतून तो नवी मुंबईतील सलीम पटेलच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे अधिकाऱ्यांनी पटेल याला अटक केली. 

टॅग्स :neet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीकMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई