शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

निकालानंतरही पक्षासोबत राहतील अशा नेत्यांची आघाडीला गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 14:39 IST

राष्ट्रवादीने दुसऱ्या फळीतील नेते बाहेर काढून आणि सत्ताधारी पक्षातील नाराजांना घेऊन उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, हेच नेते निवडून आल्यानंतर पक्षासोबत राहतील का, याची खात्री मिळणे अशक्य आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर होत असताना बंडखोरीचे गृहन जवळजवळ सर्वच पक्षांना लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातून मोठ्या प्रमाणात नेत्यांनी पलायन केले आहे. तर साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे हीच स्थिती विरोधी पक्षांसोबत निवडणूक झाल्यानंतरही होऊ शकते. त्यामुळे विजयी झाल्यानंतर आमदारांना पक्षात टीकून ठेवण्याचे आव्हान आघाडीसमोर असणार आहे. किंबहुना अशाच नेत्यांचा शोध आघाडीला आहे.

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्रिशंकू स्थिती झाली होती. त्यावेळी काँग्रेस आणि जेडीएस यांनी युती करून सरकार स्थापन केले. परंतु, हे सरकार पाच वर्षे पूर्ण करू शकले नाही. भारतीय जनता पक्षाने काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार फोडून कुमारस्वामी यांचे सरकार पाडले. 10 हून अधिक आमदारांनी यावेळी बंडखोरी केली होती.

महाराष्ट्रात आतापर्यंत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. तिच स्थिती यावेळी देखील राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला मित्र पक्षाची मदत लागणारच आहे. त्यामुळे निकालानंतर राज्यात त्रिशंकू स्थिती झाल्यास, पुन्हा बंडखोरीला ऊत येऊ शकतो. या स्थितीपासून वाचण्यासाठी उमेदवारी देतानाच पक्षांशी निष्ठा ठेवून राहितील अशा नेत्यांनाच तिकीट देण्याचे आव्हान सर्वच राजकीय पक्षांकडे आहे.

निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेते सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत दाखल झाले. त्यानंतर राष्ट्रवादीने दुसऱ्या फळीतील नेते बाहेर काढून आणि सत्ताधारी पक्षातील नाराजांना घेऊन उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, हेच नेते निवडून आल्यानंतर पक्षासोबत राहतील का, याची खात्री मिळणे अशक्य आहे.  त्यामुळे उमेदवारी देतानाच याची काळजी घेण्याचे शिवधनुष्य आघाडीला पेलावे लागणार आहे.