मागणीअभावी सोने स्वस्त
By Admin | Updated: June 3, 2014 23:13 IST2014-06-03T23:13:39+5:302014-06-03T23:13:39+5:30
दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 2क् रुपयांच्या घसरणीसह 27,2क्क् रुपये प्रतितोळा झाला.

मागणीअभावी सोने स्वस्त
>प्रतितोळा 27,2क्क् : चांदीचा भाव प्रतिकिलो 4क्,7क्क्
नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पाश्र्वभूमीवर चांगली मागणी न मिळाल्याने मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 2क् रुपयांच्या घसरणीसह 27,2क्क् रुपये प्रतितोळा झाला. तथापि, औद्योगिक संस्था आणि नाणो निर्मात्यांकडून उठाव मिळाल्याने चांदीचा भाव 35क् रुपयांनी उंचावून 4क्,7क्क् रुपये प्रतिकिलो राहिला.
बाजारातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारातील स्थिती कमजोर झाल्याचा देशी बाजार धारणोवर परिणाम झाल्याचे दिसून आले. सराफा व्यापा:यांकडून चांगली मागणी न मिळाल्याने बाजारात घसरणीचा कल होता. अमेरिकी अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याने तेथे समभागांमध्ये पर्यायी गुंतवणूक होत आहे. दुसरीकडे तयार चांदीचा भाव 35क् रुपयांनी वाढून 4क्,7क्क् रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भावही 33क् रुपयांनी उंचावून 39,83क् रुपयांवर आला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव 75,क्क्क् ते 76,क्क्क् रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4दिल्ली बाजारातच 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 2क् रुपयांनी स्वस्त होऊन अनुक्रमे 27,2क्क् आणि 27,क्क् रुपये प्रतितोळा झाला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव 24,4क्क् रुपयांवर कायम राहिला.
4सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव कालच्या 1,243.93 वरून 1,243.क्9 डॉलर प्रतिऔंस
राहिला.