शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Maratha reservation: मराठ्यांना आरक्षण देणं सरकारच्याच हाती!

By वैभव देसाई | Updated: July 26, 2018 20:51 IST

मराठ्यांना आरक्षण देणं हे सरकारच्या मानसिकतेवर अवलंबून आहे.

मराठ्यांनी आरक्षणासाठी आंदोलन केल्यानंतर काही विघ्नसंतोषी लोकांनी त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आहे. काही झारीतले शुक्राचार्यच मराठा आंदोलनाला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचतायत. आतापर्यंत मराठा समाजानं काढलेली आंदोलनं ही शांततेत पार पडली होती. पण मराठ्यांवर असं आंदोलन करण्याची वेळ का आली, याचा अद्यापही कोणी विचार केलेला दिसत नाही. मराठा समाज हा वतनदार असला तरी तो कायमच उपेक्षित राहिलेला आहे. नोकरी, शिक्षणात आरक्षण नसल्यानं गुणवत्ता असूनही मराठा समाजातील मुलांची अपेक्षित प्रगती झालेली नाही. मराठा समाज हा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा घटक आहे.समाजातील इतर घटकांचाही तो सदोदित सन्मान आणि विचार करत आलेला आहे. मोठा भाऊ असल्याच्या जबाबदारीचं भान राखूनच मराठा समाजाने कधीही कोणाच्या आरक्षणाला विरोध केलेला नाही. परंतु मराठा समाज आज आरक्षण का मागतोय, याचाही थोडा विचार करावा लागेल. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेती उद्ध्वस्त झाली अन् शेतक-यांच्या मुलांना रोजगार नाही. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, शेकडो कुटुंबे उघड्यावर आली. त्यामुळेच शेतक-यांची मुलं आता शेती सोडून शहराकडे वळली आहेत. अनेक शेतकरी आणि मराठ्यांच्या मुलांकडे कौशल्य असूनही त्यांना पाहिजे तशा नोक-या नाहीत. आरक्षण नसल्यानं त्यांची प्रगती खुंटतेय. आर्थिक खाईत लोटला गेलेल्या मराठा समाजाला बाहेर आणण्यासाठी आता तरी सरकारनं पुढाकार घेण्याची गरज आहे. 

परंतु काही समाजकंटक मराठा आंदोलनाच्या आडून दोन समाजांमध्ये दुही माजवण्याचंही काम करतायत. अॅट्रॉसिटीचा मुद्दा काढून मराठा-दलितांमध्ये तेढ पसरवणं तसेच आरक्षणाच्या निमित्ताने मराठा-ओबीसींमध्ये वाद निर्माण करण्याचे प्रकारही केले जातायत. या सर्व प्रकारांपासून आपणच सावध झालं पाहिजे. तसेच या आंदोलनाला हिंसक वळण देणा-या समाजकंटकांवरही कारवाई करण्याची गरज आहे. काही विघ्नसंतोषी लोकांकडून या आंदोलनाला राजकीय रंगही दिला जातोय. त्यामुळे उद्या जर महाराष्ट्रात हिंसाचार उफाळून आला, तर त्याला मराठा समाज जबाबदार राहणार नाही हेही सरकारनं वेळीच लक्षात घ्यावं. असो. मुद्दा हा की मराठ्यांना आरक्षण देणे कठीण असलं तरी अशक्य नाही. फक्त मराठा ही जात सामाजिक मागास असल्याचं सरकारला जाहीर करावं लागेल.तामिळनाडूच्या धर्तीवर घटनेत सुधारणा करत 52% टक्के असलेलं आरक्षण 68% करून इतर मागास प्रवर्गात मराठ्यांना स्थान देता येईल. जेणेकरून वेगळ्या आयोग स्थापन करावा लागणार नाही. तसेच सरकारनं न्यायालयात मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात योग्य भूमिका मांडावी. अशा प्रकारे सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ शकतं. मराठा आरक्षण ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया असली तरी ती सुटण्यासारखी आहे. त्यामुळे जर सरकारला खरंच मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर पहिल्यांदा सत्ताधा-यांनी मराठ्यांबाबतची मानसिकता बदलावी. अन्यथा मराठा समाजाच्या भावनांचा कडेलोट झाल्यास त्याचं पातक सरकारच्याच माथी जाईल.  

टॅग्स :marathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा