शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Chief Justice N.V. Ramana : राष्ट्रीय न्यायिक पायाभूत सुविधा प्राधिकरण स्थापण्याची गरज, सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा; प्रस्ताव सरकारकडे पाठवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 06:06 IST

Chief Justice N.V. Ramana : औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन न्या. रमण्णा यांच्याहस्ते शनिवारी झाले.

औरंगाबाद : भारतात न्यायालयांनी कायम मोडकळीस आलेल्या इमारतींमधूनच काम केलेले असल्यामुळे त्यांना अद्ययावत सोयी-सुविधा पुरविल्या पाहिजेत, हा विचारच मागे पडला आहे. त्यामुळे मी राष्ट्रीय न्यायिक पायाभूत सुविधा प्राधिकरण (नॅशनल ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर ॲथॉरिटी) स्थापन केले पाहिजे, असा प्रस्ताव विधी व न्यायमंत्र्यांना पाठवला आहे. त्यांनी संसदेच्या आगामी अधिवेशनात हा प्रस्ताव मांडून प्राधिकरण स्थापन करावे, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी शनिवारी येथे केले.

औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन न्या. रमण्णा यांच्याहस्ते शनिवारी झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरण रिजिजू, ॲडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया अनिल सी. सिंग आणि राज्य शासनाचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आदी उपस्थित होते.

सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्याकरिता संघर्ष करावा लागू नये, न्याय त्यांच्यापर्यंत विनासायास पोहोचावा, यासाठी न्यायव्यवस्थेला आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास केंद्र शासन कटिबद्ध असून निधी कमी पडू देणार नाही,  असे केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री किरण रिजिजू म्हणाले.

लोकांचा विश्वास हीच मोठी शक्तीसमाजासाठी न्यायालये अत्यावश्यक असतात. लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास ही लोकशाहीची मोठी शक्ती आहे. न्यायालये लोकांना न्यायाच्या घटनात्मक हक्काची हमी देतात. विस्तारित इमारतीच्या निमित्ताने या भागातील नागरिकांना न्यायव्यवस्थेकडे दाद मागण्याची अधिक मोठी सुविधाच प्राप्त झाली असेही न्या. रमणा म्हणाले.

- न्या. उदय लळित यांनी, विस्तारित इमारतीमुळे खंडपीठातून न्यायदानाची अधिक मोठी सुविधा उपलब्ध झाल्याचे म्हटले.- अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न्यायदानासाठी करावा, असे आवाहन करून डॉ. न्या. धनंजय चंद्रचूड यांनी ई- फायलिंगमध्ये मोठी वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले. - न्या. भूषण गवई यांनी घटनेला अभिप्रेत असलेला शेवटच्या माणसाला न्याय उपलब्ध करून देण्यानेच देश आणि लोकशाही अधिक मजबूत होईल, असे मत व्यक्त केले. न्या. अभय ओक यांनी, खंडपीठातून पक्षकारांना अधिक वेगवान न्याय मिळू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

- मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी न्यायव्यवस्थेला आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे सांगितले. - न्या. ए. ए. सय्यद यांनी राष्ट्रीय आणि राज्य विधिसेवा प्राधिकरणामार्फत कायद्याबाबत जागरूकता निर्माण होणे आवश्यक असल्याचे सांगितले. कायदा जागरुकतेसंदर्भातील फलकाचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :N V Ramanaएन. व्ही. रमणाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबाद