शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

रक्त हवे, २८०० रुपये मोजा!

By admin | Updated: June 15, 2014 00:47 IST

रुग्णाला जीवदान देण्यासाठी रक्त मिळविण्याची धडपड करणाऱ्या नातेवाइकांचा खिसा आता रिकामा होणार आहे. रुग्णांना १६०० रुपयांना मिळणारी रक्ताची पिशवी तब्बल २८०० रुपयांत मिळण्याची शक्यता आहे.

७५ टक्के वाढ : एफएनबीबी वाढविणार किंमत नागपूर : रुग्णाला जीवदान देण्यासाठी रक्त मिळविण्याची धडपड करणाऱ्या नातेवाइकांचा खिसा आता रिकामा होणार आहे. रुग्णांना १६०० रुपयांना मिळणारी रक्ताची पिशवी तब्बल २८०० रुपयांत मिळण्याची शक्यता आहे. त्या संदर्भातील प्रस्ताव तयार झाला असून तो लवकरच लागू होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. प्रोसेसिंग चार्ज आकारण्यासाठी रक्तपेढ्यांना दिलेली सवलत पेशंटच्या मुळावर उठण्याची शक्यता आहे.राष्ट्रीय रक्त संक्र मण परिषदेने २००५ मध्ये सरकारी आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या रक्तपेढ्यांमध्ये रक्तासाठी ८५० रु पये सेवाशुल्क आकारण्यास परवानगी दिली. पण वाढती महागाई, वीजदर, रक्तासाठीच्या पिशव्या, कर्मचारी व डॉक्टरांचे वाढलेले पगार आणि रक्तदान शिबिरांपासून रक्त चाचण्यापर्यंतचा खर्च परवडण्याजोगा नसल्याची कारणे दिल्याने या रक्तपेढ्यांनी रक्त सेवाशुल्काकरिता प्रस्तावित दर १९०५ ते १०५० इतके ठरवले होते. यामुळे मागील वर्षापर्यंत एका रक्ताच्या पिशवीचा दर १४०० रुपये होता. आता हाच दर १६०० रुपयांवर गेला आहे. फेडरेशन आॅफ नागपूर ब्लड बँकेने (एफएनबीबी) आता यात पुन्हा वाढ करण्याचे ठरविले आहे. तब्बल १२०० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय रक्त संक्र मण परिषदेने (एनबीटीसी) फेब्रुवारीमध्ये जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेत रक्ताच्या पिशवीच्या किमतीत वाढ केल्याचे या फेडरेशनचे म्हणणे आहे. परंतु एका पिशवीची किमत किती राहणार यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात विविध चॅरिटेबल ट्रस्टकडून लाईफ लाईन, जीवनज्योती, डॉ. हेडगेवार, रेनबो, आयुष, लता मंगेशकर हॉस्पिटल, अर्पण आणि साईनाथ रक्तपेढ्या चालविल्या जातात. या रक्तपेढ्यांची फेडरेशन आॅफ नागपूर ब्लड बँक (एफएनबीबी) ही संस्था आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या संस्थेने संपूर्ण रक्त (होल ब्लड) २८०० रुपये, पॅक्ड रेड सेल २२०० रुपये, प्लेटलेट कॉन्सस्ट्रेट ९००, फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा ९००, क्र ायोप्रिसिप्लेट ७५० असे दर वाढविण्याच्या विचारात आहे. (प्रतिनिधी)