एनडीए पायाभूत सुविधांत वाढ

By Admin | Updated: May 14, 2014 05:21 IST2014-05-13T21:50:22+5:302014-05-14T05:21:38+5:30

एनडीएमध्ये आवश्यक असणार्‍या पायाभूत सुविधांमध्ये २०१४-१५ या वर्षात वाढ करण्यात येणार आहे. यासाठी विकास योजना आखण्यात आल्या आहेत.

NDA Infrastructure Development | एनडीए पायाभूत सुविधांत वाढ

एनडीए पायाभूत सुविधांत वाढ

एनडीएमध्ये आवश्यक असणार्‍या पायाभूत सुविधांमध्ये २०१४-१५ या वर्षात वाढ करण्यात येणार आहे. यासाठी विकास योजना आखण्यात आल्या आहेत. यामध्ये स्वाड्रन इमारत, ८ प्रयोगशाळा, १६ प्रशिक्षण वर्ग आणि मोठया ऑडिटोरिअमचा आदींचा समावेश आहे. याचबरोबर शस्त्र प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेले सिम्युलेटर, द्रोण एमके ३ सिम्युलेटर व नाईट व्हिजन उकरणे याचबरोबर उच्च क्षमतेची होडी, ८ रोईंग होडी, ३ जेट स्काई आणि एक लेजर बोट आदींची खरेदीही करण्यात येणार आहे.
---------
विद्यार्थ्यांची संख्या वाढणार
पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाल्यानंतर एनडीएमध्ये प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येतही वाढ होवू शकते. सध्या येथे २१०० विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. ती संख्या वाढून २४ ०० पर्यंत नेण्यात येणार आहे. यामुळे तिन्ही दलांमध्ये रिक्त असलेली पदे भरण्यासाठी अनुकुल स्थिती निर्माण होवू शकते. सध्या तिन्ही दलात १३ हजार पदे रिक्त आहेत.

Web Title: NDA Infrastructure Development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.