शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीची 'ही' खेळी काँग्रेसला पडणार भारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 15:51 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपद आपल्याकडे राखून पुढील काम सोपं केलं आहे. तर काँग्रेसची उपमुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा अपूर्णच राहिली आहे. 

मुंबई - राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. या सरकारमध्ये तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोनच नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री पदावरून पेच निर्माण झाला होता. हा पेच सुटला असून विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला मिळाले आहे.  इथेच राष्ट्रवादीची डाव साधला असून आगामी काळात हे काँग्रेससाठी अडचणीचे ठरू शकते. 

महाविकास आघाडीत विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले आहे. काँग्रेसकडून शेतकरी नेते नाना पटोले अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. काँग्रेसला विधानसभा अध्यक्षांऐवजी उपमुख्यमंत्रीपद हवं होतं. मात्र त्यांना विधानसभा अध्यक्षपदावर समाधान मानावे लागले आहे. तर राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्रीपद आपल्याकडे घेण्यात यश मिळवले आहे. 

प्रसिद्धच्या दृष्टीने उपमुख्यमंत्रीपद अत्यंत आवश्यक आहे. याचं महत्त्व राष्ट्रवादीला चांगलेच ठावूक होते. सरकारी जाहिरातीत प्रामुख्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटो पेपरवर दिसतो. त्यात विधानसभा अध्यक्षांना स्थान नसते. आता राष्ट्रवादीकडे हे पद गेल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्र्यांचा फोटो दिसणार आहे. यामुळे सर्वसामान्यांत हे सरकार केवळ शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहे का, असा संदेश जाण्याचा संभव आहे. याविषयी एक काँग्रेस नेत्याने नाराजी देखील दर्शविली होती. 

एकूनच राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपद आपल्याकडे राखून पुढील काम सोपं केलं आहे. तर काँग्रेसची उपमुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा अपूर्णच राहिली आहे.