राष्ट्रवादीची उमेदवार निवड प्रक्रिया 1 ऑगस्टपासून

By Admin | Updated: July 20, 2014 01:08 IST2014-07-20T01:08:11+5:302014-07-20T01:08:11+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीचे उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे.

NCP's election process from August 1 | राष्ट्रवादीची उमेदवार निवड प्रक्रिया 1 ऑगस्टपासून

राष्ट्रवादीची उमेदवार निवड प्रक्रिया 1 ऑगस्टपासून

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीचे उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मुख्य उपस्थितीत काल मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती सूत्रंनी दिली. 
इच्छुकांकडून अर्ज मागविणो, त्यांची छाननी, उमेदवारांच्या मुलाखती, जिल्हानिहाय पदाधिका:यांची मते जाणून घेणो, पक्षनेतृत्वाकडे नावांची शिफारस करणो अशी प्रक्रिया राबविली जाणार आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पवार 26 जुलैला पुन्हा घेणार आहेत. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
 
 
समन्वय समिती 23 जुलैला
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय समितीची बैठक 23 जुलै रोजी मुंबईत होण्याची शक्यता आहे. या बैठकीला दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहतील. 
काँग्रेसचा मेळावा 25ला
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसचा विभागीय मेळावा 25 जुलै रोजी नागपुरात मानकापूर येथील क्रीडा संकुलात होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अ.भा. काँग्रसचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अ.भा. सरचिटणीस मुकुल वासनिक आदी नेते मार्गदर्शन करतील. 

 

Web Title: NCP's election process from August 1