राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर गोळीबार

By Admin | Updated: April 16, 2016 02:37 IST2016-04-16T02:37:00+5:302016-04-16T02:37:00+5:30

गोंदिया नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक पंकज यादव यांच्यावर शुक्रवारी रुग्णालयातच हल्ला झाला. रात्री नऊच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पिस्तुलमधून

NCP's corporator firing | राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर गोळीबार

राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर गोळीबार

गोंदिया : गोंदिया नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक पंकज यादव यांच्यावर शुक्रवारी रुग्णालयातच हल्ला झाला. रात्री नऊच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पिस्तुलमधून त्यांच्यावर गोळी झाडली. यादव यांच्या पोटाला गोळी लागल्याचे पोलिसांनी सांगितले. दीड वर्षापूर्वी गोंदिया नगर परिषदेतील कामगार नेता छेदीलाल इमलाह यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. त्या कटात पंकज यादव यांचा हात असल्याचा आरोप असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. जिल्हा रुग्णालयात भरती आहेत. पंकज यादव यांच्यावर १० महिन्यांपूर्वी गोंदिया नगर परिषदेच्या आवारात चाकूहल्ला झाला होता. (प्रतिनिधी)

Web Title: NCP's corporator firing