शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली, किरण काळे व जगताप समर्थकांमध्ये बाचाबाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 17:57 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे बडतर्फ केलेले १८ नगरसेवक राष्ट्रवादी भवनमध्ये आल्याच्या कारणावरून जिल्हा युवकचे माजी अध्यक्ष किरण काळे आणि आ. संग्राम जगताप यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच जुंपली.

अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसचे बडतर्फ केलेले १८ नगरसेवक राष्ट्रवादी भवनमध्ये आल्याच्या कारणावरून जिल्हा युवकचे माजी अध्यक्ष किरण काळे आणि आ. संग्राम जगताप यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच जुंपली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच हा वाद झाला.राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये दुपारी तीन वाजता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत  बैठक सुरू आहे. या बैठकीत दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी भवनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ बडतर्फ झालेले नगरसेवक बैठकीत आले. हे पाहिल्यानंतर किरण काळे यांनी त्याला आक्षेप घेतला. यावरून आ. संग्राम जगताप यांचे समर्थक आणि काळे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. बडतर्फ नगरसेवक हे आमदार संग्राम जगताप यांचे समर्थक असल्याने  ते बैठकीत आले आहेत, असे जगताप समर्थक सांगत होते. यालाही काळे यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे जोरदार वादावादी झाली. कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यासमोरच एकमेकांचे उणेदुणे काढले. तेथे उपस्थित असलेले आ. अरुण जगताप यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.महापौर निवडणुकीमध्ये आ. संग्राम जगताप यांच्या आदेशावरून राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांनी भाजपला मतदान करून उघड पाठिंबा दिला. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शहराध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांना पदावरून हटवित १८ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केली होती. हे नगरसेवक आज पाटील यांना भेटून त्यांची बाजू मांडणार होते. त्यासाठीच ते राष्ट्रवादी भवनमध्ये आले होते. मात्र त्यांची पक्षातून हकालपट्टी झाल्याने त्यांना राष्ट्रवादी भवनमध्ये प्रवेश देण्यावर किरण काळे यांनी आक्षेप घेतल्याने बैठकीच्या वेळी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगरSangram Jagtapआ. संग्राम जगतापNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटील