शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
4
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
5
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
6
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
7
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
8
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
9
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
10
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
11
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
12
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
13
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
14
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
15
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
16
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
17
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
18
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
19
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
20
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...

राष्ट्रवादीत बंडखोरी होणार नाही - तटकरेंना विश्वास

By admin | Updated: September 22, 2016 18:29 IST

जिल्हा राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत १५ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत मिटले आहेत.

ऑनलाइन लोकमतबीड, दि. २२ : जिल्हा राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत १५ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत मिटले आहेत. सर्वनेते एकजुटीने काम करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणकीत बंडखोरी, आघाड्या होणार नाहीत, अशी स्पष्टोक्ती करतानाच सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजी असल्याने राष्ट्रवादीलाच चांगले यश येईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटबांधणीसाठी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांचा राज्यव्यापी दौरा सुरु  आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर राष्ट्रवादी भवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, पक्षनिरीक्षक जीवनराव गोरे, आ. अमरसिंह पंडित, माजी मंत्री बदामराव पंडित, जि.प. अध्यक्ष विजयसिंह ंपंडित, माजी आ. उषा दराडे, सय्यद सलीम, नंदकिशोर मुंदडा, जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, रवींद्र क्षीरसागर, अ‍ॅड. शेख शफीक, अ‍ॅड. हेमा पिंपळे, परमेश्वर सातपुते यांची उपस्थिती होती. तटकरे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडी करण्याच्या संदर्भाने वरिष्ठ पातळीवर सकारात्मक चर्चा झालेली आहे. सत्ताधारी सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. आघाडी सरकारच्या काळात करसवलती दिल्या होत्या, आता मात्र करात वाढ केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक महागाईत होरपळून निघत आहे. मराठा आरक्षण, डान्सबार बंदीचे निर्णय न्यायालयात टिकत नाहीत. सरकार तज्ज्ञ वकिलांमार्फ त न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडत असल्याची टीकाही त्यांनी केली. स्मार्टसिटी, वॉटर ग्रीड या घोषणा हवेतच असून स्मार्टसिटीसाठी दोन वर्षांत एक रुपया तरी दिला का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.मराठा क्रांती मोर्चांबाबत सरकार बेफिकीरकोपर्डी (ता. पाथर्डी) येथील घटनेनंतर ठिकठिकाणी मराठा समाजाचे क्रांती मोर्चे निघत आहेत. समाजाच्या भावना तीव्र आहेत. लाखोंच्या संख्येने महिला व युवती सहभागी होत आहेत. शिस्तबद्धपणे निघणाऱ्या या मोर्चांची सरकारकडून आणखी गांभीर्याने नोंद घेण्यात आली नाही, असा टोला तटकरेंनी लगावला. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टच्या संदर्भात खा. पवार यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. या कायद्यातील काही कलमांचा कमी- अधिक वापर होत असल्याने त्यात सुधारणा करता येईल का? याचा सरकारने विचार करावा, अशी मागणी पक्षाने केलेली असल्याचे त्यांनी सांगितले.