शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
2
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
3
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
4
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
5
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
6
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
7
पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
8
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
9
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
10
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
11
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
12
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
13
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
14
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
15
रशियात भारतीय १०० रुपयांचे मूल्य किती! व्यापारावर याचा थेट कसा परिणाम होतो?
16
केकेआरला पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, त्यानेच मैदान गाजवलं; २१५ च्या स्ट्राइकनं केल्या धावा
17
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
18
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
19
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
20
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
Daily Top 2Weekly Top 5

किमान शब्दांत कमाल टीका; पुण्यात शरद पवारांकडून राज ठाकरेंचा समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 15:38 IST

शरद पवारांचं राज ठाकरेंवर टीकास्त्र

पुणे: मनसे प्रमुख राज ठाकरेंनी दोनच दिवसांपूर्वी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निघालेल्या मोर्चांविरोधात मोर्चा काढला. आता मोर्चाला मोर्चानं उत्तर दिलंय. यापुढे फार नाटकं केल्यास दगडाला दगडानं आणि तलवारीनं तलवार उत्तर मिळेल, अशा शब्दांत राज ठाकरे आझाद मैदानातल्या सभेतून बरसले. राज ठाकरेंच्या या विधानावरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी त्यांना लक्ष्य केलं.

राज ठाकरेंना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. काही जण त्यांचं भाषण ऐकायला येतात, तर काही जण त्यांना पाहायला येतात, असा टोला शरद पवार यांनी लगावला. दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर भाष्य करण्यासाठी पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचं अभिनंदन करताना भाजपावर तोफ डागली. दिल्लीत भाजपाचा पराभव होणारच होता. दिल्लीत जे घडलं, तेच इतर राज्यांमध्येही घडू शकतं. भाजपाच्या पराभवाची प्रक्रिया सुरू झाली असून आती ती थांबेल, असं वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टीच निवडून येईल, असं अनेक जण म्हणत होते. त्यामुळे या विधानसभा निवडणूक निकालानं मला आश्चर्य वाटलं नाही. भाजपाचा पराभव होणारच होता. भाजपा देशावरील आपत्ती आहे, अशा शब्दांत पवारांनी भाजपाला लक्ष्य केलं. भाजपाचा पराभव शक्य आहे. त्यासाठी आम्ही लोकांना पर्याय द्यायला हवा, असं शरद पवार म्हणाले. धार्मिक कटुता लोकांना मान्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांमुळे संसदेत दहशतीचं वातावरण आहे, असंदेखील त्यांनी म्हटलं. तरुणांना रोजगार मिळाला नाही, तर ते पंतप्रधान मोदींना दंडुक्यानं मारतील, असं काही दिवसांपूर्वीच राहुल गांधींनी एका प्रचारसभेत म्हटलं होतं. त्यावर राहुल यांनी असं बोलायला नको होतं, असं मत पवारांनी व्यक्त केलं.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसdelhi electionदिल्ली निवडणूकAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदी