शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 14:15 IST

Sunil Tatkare On Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असेही सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.

Sunil Tatkare On Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात विकृत आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून अशोक खरात याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मोठी मागणी राष्ट्रवादी खासदार आणि नेते सुनील तटकरे यांनी केले आहे. सुनील तटकरे पत्रकारांशी बोलत होते. 

भोंदूबाबा खरात याच्या आर्थिक साम्राज्याचे धागेदोरे आता अधिक गडद होऊ लागले आहेत. सिन्नर तालुक्यातील जगदंबा पतसंस्थेत खरातने ठेवी ठेवण्यासाठी तब्बल ३२ खाती उघडल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, ही सर्व खाती खरात स्वतःच ऑपरेट करत असल्याची कबुली पतसंस्थेच्या व्यवस्थापकाने दिली आहे. वाकचौरे व पोलिस निरीक्षक अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ रंजीत गलांडे यांनी पतसंस्थेच्या व्यवस्थापकाचा सविस्तर जबाब नोंदवला. खरातने स्वतःच ३२ वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर या संस्थेत सुमारे २ कोटी ७४ लाख रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे २०२४ मध्ये त्याने या सर्व रकमा काढूनही घेतल्या. ही सर्व खाती खरातच हाताळत होता.

अशोक खरात प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, फाशी द्यावी

पत्रकारांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, अशोक खरात असो वा कोणी असो, अशी विकृत वृत्ती ठेचून काढली पाहिजे. अशोक खरात याचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून जी काही फाशीची शिक्षा द्यायची आहे, ती दिली जावी. या विषयावर पूर्वीही बोललो होतो. सरकारने विशेष तपास पथक स्थापन केले आहे. त्यातून चौकशी होत आहे. सखोल तपास करावा. ज्यांचा कळत अथवा नकळत संबंध आला असेल, त्या सर्वांवर कठोर कारवाई करावी, अशी आमच्या सर्वांची मागणी आहे, असे तटकरे यांनी सांगितले.

दरम्यान, बारामतीची पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी म्हणून तुळजाभवानीला साकडे घातले. अजित पवारांच्या अपघाताच्या प्राथमिक अहवालाबाबत आम्ही समाधानी नाही. जय पवार अगोदरच पत्रकार परिषद घेणार होते. त्यांनी बारामतीलाच खुलासा केला आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Sunil Tatkare demands Ashok Kharat face swift justice, execution.

Web Summary : NCP leader Sunil Tatkare demands swift trial and execution for Ashok Kharat, labeling him a pervert. Kharat's financial irregularities in Sinnar's Jagdamba credit society, involving numerous accounts and large sums, are under investigation. Tatkare insists on strict action against all involved.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातsunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस