शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपच्या वाटेवर; शिवसेना नेत्याचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 13:57 IST

एवढेच नाही, तर शरद पवार यांनी जेव्हा आपल्या पदाचा राजीनामा दिला तेव्हा जयंत  पाटील का रडत होते, हे तुम्हाला माहीत आहे का? असा सवाल करत, यावरूनही शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भाजपच्या वाटेवर असल्याचा मोठा दावा शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. एवढेच नाही, तर शरद पवार यांनी जेव्हा आपल्या पदाचा राजीनामा दिला तेव्हा जयंत  पाटील का रडत होते, हे तुम्हाला माहीत आहे का? असा सवाल करत, यावरूनही शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिरसाट म्हणाले, "राष्ट्रवादीला आमचा पुळका का आला आहे? हे कळायला मार्ग नाही. जे जयंत पाटील आज स्वतःच भाजपच्या वाटेवर आहेत, ते असे म्हणतात. ज्या पक्षाची स्थापनाच मुळात गद्दारीतून झाली आहे. सोनिया गांधी यांच्या सोबत केलेली गद्दारी, त्यातून निर्माण झालेले हे सर्व आणि ते आम्हाला आता गद्दारीची भाषा शिकवणार, हा संपूर्ण हास्यास्पद प्रकार आहे. त्यामुळे आम्ही त्यांची चिंता करत नाही, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. ते एबीपी माझासोबत बोलत होते.

शरद पवार यांनी जेव्हा राजीनामा दिला, तेव्हा जयंत  पाटील का रडत होते हे तुम्हाला माहीत आहे? त्यांना उद्या काय घडणार हे माहीत आहे. त्यामुळे आता काय करू, शरद पवार साहेब तुम्ही राजीनामा दिला, तर मी तर मेलोच. म्हणून ते ओक्साबोक्सी रडत होते. ते शरद पवार यांच्या राजीनाम्यावर रडत नव्हते. त्यांचं रडणं वेगळं होतं. तुम्हाला सांगतो, असं बोलणारे पटकन उड्या मारतात. त्यामुळे काही दिवस वाट पाहा, तुम्हाला त्यांचे मार्गक्रमण कुठे तरी झालेले दिसेल, असेही शिरसाट म्हणाले.

जयंतराव पाटील यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केलं होतं असं आवाहन -जयंत पाटील यांनी, "खोक्यांचे राजकारण करून धोक्याने सत्ता बळकावलेल्या गद्दारांची सत्तेतून पायउतार व्हायची वेळ आली आहे. यासाठी गद्दारांचे डोके, खोक्यांनीच केले ओक्के, ही घोषणा राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत देऊन या खोके सरकारचा निषेध व्यक्त करावा. शिंदे सरकार हे खोक्यांमुळेच ओक्के केले असल्याने या सरकारचे हे क्षणिक सुखाला उतरती कळा लागली आहे, हा विश्वास जनतेला पटवून देण्याचा निर्धार करावा. शहराच्या प्रमुख ठिकाणी या खोके सरकारविरोधात प्रतिकात्मक खोक्यांचा देखावा उभा करावा. अशाप्रकारे पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिळून या दिवसाचा निषेध व्यक्त करावा," असे म्हटले आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSanjay Shirsatसंजय शिरसाटShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस