शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

“कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळाले पाहिजे”: अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 21:08 IST

NCP SP MP Amol Kolhe On Maratha Reservation: जातीय जनगणना झाली पाहिजे, असे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

NCP SP MP Amol Kolhe On Maratha Reservation: आताच्या घडीला आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाज आणि मराठा समाज आपापल्या भूमिकांवर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, यावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके ठाम आहेत. तर काही झाले तरी ओबीसीतून आरक्षण मिळावे. सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, असा आग्रह मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धरला आहे. यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून, आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मत व्यक्त केले आहे. 

मीडियाशी बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, समाज सगळ्याच घटकांपासून बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. सगळ्या समाज घटकांच्या आकांक्षांचा विचार होणे तितकेच महत्त्वाचे आहे. संसदेत नियोजन घेण्याची मागणी केली असून ती सर्वांची मागणी आहे, जातीय जनगणना झाली पाहिजे. जातीय जनगणना झाली तर हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी फायदा होईल, असे अमोल कोल्हे यांनी सांगितले.

...तर स्वागत करू

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील काही नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. यावर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली. मी ही ऐकले आहे. माझी अजून भेट झाली नाही. अडचणीच्या काळात ज्या कार्यकर्त्यांनी मदत केली. त्या सर्वांना विश्वासात घेऊनच पक्षश्रेष्ठी हा सगळा पक्षप्रवेशाचा निर्णय घेतील. अडचणीच्या वेळी जे लोक सोबत होते त्यांचे मत आणि मेहनत दुर्लक्षित करून चालणार नाही. येणारे का येत आहेत आणि त्यांची का गरज आहे, याचा विचार करून स्वागत करू, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेस